चंदगड / सी एल न्यूज
सातवणे (ता. चंदगड) येथील शाहू काजू फॅक्टरी, चाळोबा येथे उद्या सोमवार दि. १६ मार्च २०२६ रोजी सकाळी ठीक १० वाजता कृषी विभागाच्या वतीने तालुकास्तरीय शेतकरी प्रशिक्षण आयोजित केले आहे.
या शेतकरी प्रशिक्षणामध्ये भुईमूग, ऊस, नाचणी रोग कीड व्यवस्थापन, ऊस रोटा/हुमणी कीड व्यवस्थापन, अन्नप्रक्रिया उद्योग अनुदान माहिती (नाचणी, काजू, मसाले इत्यादी उद्योगासाठी साधारण ३ ते ६ लाख अनुदान), काजू पीकावरील रोग कीड व्यवस्थापन या विषयावर केवीके कोल्हापूरचे पांडुरंग मोहिते व ऋतुराज चव्हाण हे तज्ञ मार्गदर्शक उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
प्रशिक्षणार्थींच्यासाठी सकाळी ९ वाजता नाश्त्याने कार्यक्रमाची सुरुवात होईल. तज्ञ मार्गदर्शक यांचे वरील विषयावरील मार्गदर्शन होईल. दुपारी १२ ते १ च्या दरम्यान स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता होईल.
सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment