चंदगड : सी एल न्यूज
खेडूत शिक्षण मंडळ, कालकुंद्री संचलित न. भु. पाटील कनिष्ठ महाविद्यालय, चंदगड या कॉलेला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांचा भव्य मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळत संस्थेप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष एल. डी. कांबळे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. व्ही. बी. गावडे यांनी शोकप्रस्ताव मांडला. प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख प्राचार्य आर. पी. पाटील यांनी करून दिली.
या वेळी प्रमुख पाहुणे डॉ. टी. एस. पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “माजी विद्यार्थी हीच संस्थेची खरी संपत्ती आहे. खेडूत शिक्षण संस्था म्हणजे नवरत्नांची खाण आहे. या खाणीतून हिरे-मोत्यांसारखी अनेक नवरत्ने घडली असून त्यांच्या कार्यामुळे आज चंदगड तालुक्यात शैक्षणिक उठाव निर्माण झाला आहे. दातृत्व हा चंदगडच्या मातीचा गुण असल्यामुळे समाजासाठी देण्याची परंपरा येथे जिवंत आहे.”
यावेळी प्रमुख पाहुणे नरसू पाटील यांनीही आपल्या मनोगतात सांगितले की, “खेडूत शिक्षण संस्थेने मला सकारात्मकता दिली. त्यामुळेच आज मी अभिमानाने सांगतो की, खेडूतने मला घडवले.” त्यांच्या या भावनिक गौरवोद्गारांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मेळाव्याच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांनी संस्थेबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत उदारहस्ते देणग्या जाहीर केल्या. शामराव पाटील यांनी १ लाख २५ हजार रुपये, नरसू पाटील यांनी १ लाख २५ हजार रुपये तर सुनिल काणेकर यांनी ५१ हजार रुपये देणगी जाहीर केली.
या प्रसंगी उपस्थित सर्व माजी विद्यार्थी तसेच सेवानिवृत्त प्राध्यापकांचा गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात कु. झोया मुल्ला, अॅड. संतोष मळवीकर, डॉ. गोपाळ गावडे, महादेव वांद्रे, नगराध्यक्ष सुनिल काणेकर, प्रा .एस. व्ही. गुरबे, प्रा. के. जी. शिरोडकर, प्रा. मनीषा आमणगी, प्रा. एस. एस. शिंदे, दशरथ सुतार, प्रा. उज्ज्वला देसाई आदींनी मनोगत व्यक्त करत महाविद्यालयाशी निगडित आठवणींना उजाळा दिला.
या कार्यक्रमास अॅड. एन. एस. पाटील, प्रा. आर. पी. पाटील, अनंत सुतार, एस. व्ही. सडेकर, व्ही. डी. देसाई, डी. के. कदम, डी. डी. पाटील, यांच्यासह ज्युनि कॉलेजचे सर्व प्राध्यापक वर्ग, माध्यमिक विभागाचे अध्यापक वर्ग, चतुर्थ कर्मचारी व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साबळे आणि अर्चना रेळेकर यांनी केले, तर उपप्राचार्य व्ही. एन. कांबळे यांनी आभार मानले.

No comments:
Post a Comment