लाॅकडाउनच्या पार्श्वभूमीवर आमदार राजेश पाटील यांची प्रशासनासी चर्चा, चंदगड येथील कोरोना सेंटरला भेट - चंदगड लाईव्ह न्युज

15 May 2021

लाॅकडाउनच्या पार्श्वभूमीवर आमदार राजेश पाटील यांची प्रशासनासी चर्चा, चंदगड येथील कोरोना सेंटरला भेट

 

चंदगड येथील कोरोना सेंटरला भेट देवून पाहणी करताना आमदार राजेश पाटील, तहसिलदार विनोद रणवरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. साने, एस. एस. सावळगी.

चंदगड / प्रतिनिधी

        रविवारपासून सुरू होणाऱ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर व तालुक्यातील वाढत्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता आमदार राजेश पाटील यांनी चंदगड येथे प्रशासनासोबत बैठक घेऊन लॉकडॉऊनमधील उपाययोजना बाबत व कोरोना बाधीत रुग्णांना उपचार व सेवा करण्यासाठी दक्षता घेण्याची सूचना केली.

      यावेळी तहसीलदार विनोद रणवरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजित जगताप, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. आर. के. खोत, ग्रामीण रुग्णालयांचे डॉ. एस. एस. साने, पाणी पुरवठा अभियंता ए. एस. सावळगी, बांधकाम अभियंता श्री. जाधव, पोलीस निरीक्षक बी. ए. तळेकर आदी अधिकारी उपस्थित होते. 

          गेल्या आठवड्यात ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या समवेत चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यांच्या बाबत घेतलेले जे निर्णय झाले. त्या संदर्भात चंदगड ग्रामीण रुग्णांलयाला डीसीएचचा दर्जा देऊन, तेथे ऑक्सिजन बेडची सुविधा पूर्ण झाले की नाही त्याची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. त्याच बरोबर कानुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दहा बेडची ऑक्सिजन सुविधा असून तेथे ३० ऑक्सिजन बेडची सुविधा वाढविण्यास सांगितले. चंदगड मधील कोरोना बाधित रुग्णांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत १०० जम्बो ऑक्सीजन सिलेंडरची सुविधा करून घेण्यात यावी असे सांगितले.

           दरम्यान स्टीफन्स स्कूल मध्ये सूरू असलेल्या कोविड सेंटर ला आमदार पाटील यांनी भेट दिली. सध्या येथे ३० बेडची सुविधा उपलब्ध असून त्याच ठिकाणी ते १०० बेड वाढविण्यासाठी संबंधितांना सुचना केल्या आहेत. तसेच रुग्ण संख्या वाढल्यास हलकर्णी एमआयडीसी येथील आयटीआय मुलांचे वस्तीगृह ताब्यात घेऊन तेथे ५० बेड व वेळप्रसंगी राजगोळी येथील नव्याने बांधलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ५० बेड कोविड सेंटर सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे परवानगी व आरोग्य सेवक पुरविण्याच्या संदर्भात विनंती केली असून याचा पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले.




No comments:

Post a Comment