तालुक्यात पडणाऱ्या संततधार पावसामुळे रोपलावणीच्या कामांना गती, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ - चंदगड लाईव्ह न्युज

14 July 2021

तालुक्यात पडणाऱ्या संततधार पावसामुळे रोपलावणीच्या कामांना गती, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

कोवाड (ता. चंदगड) येथील ताम्रपर्णी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

        गेल्या दोन-तीन दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीकामाला वेग आला आहे. सद्यस्थितीला रोपलावणीच्या कामांना गती आली आहे. संततधार पडणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपाताळीत वाढ झाली आहे. हवेमध्ये कमालीचा गारवा जाणावत आहे. या पावसामुळे चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्यावरील दुबार पेरणीचे संकट टळले आहे. 

              चंदगड तहसिल कार्यालायातील आपत्ती व्यवस्थापन विभागातून मिळालेल्या माहीतीनुसार आज सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात चंदगड तालुक्यात सरासरी ३२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील सर्कलनिहाय पाऊस असा सर्कलचे नाव, आजची आकडेवारी कंसात १ जून २०२१ पासून आतापर्यंतची आकडेवारी – चंदगड - ४२ (९३२), नागनवाडी – ३ (६१७), माणगाव – १५ (२७२), कोवाड – १९ (३३५), तुर्केवाडी - २७ (८०९), हेरे - ५२ (११४१). तालुक्यामध्ये आतापर्यंत सर्व सर्कलमध्ये ४१०६ मिलीमीटर पावासाची नोंद झाली असून सरासरी ६८४.३३ एवढी आहे. 



2 comments:

Unknown said...

9021920179

Unknown said...

माया होडगे

Post a Comment