देवरवाडी येथे शुक्रवारी रक्तदान शिबिर - चंदगड लाईव्ह न्युज

14 July 2021

देवरवाडी येथे शुक्रवारी रक्तदान शिबिर


माणगाव / प्रतिनिधी

          "लोकमत रक्ताचं नातं"मोहिमेंतर्गत देवरवाडी (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायत व दैनिक लोकमत आयोजित रक्तदान शिबिर शुक्रवार दिनांक १६ जुलै २०२१ रोजी सकाळी १० ते ३  या वेळेत आयोजित केले आहे.सरपंच गीता सुतार, उपसरपंच गोविंद आडाव,सामाजिक कार्यकर्ते संघर्ष प्रज्ञावंत,सेवा संस्थाध्यक्ष शंकरराव भोगण,प्रिन्स पाईपचे युनिट हेड प्रदीप माने,एच आर कल्लाप्पा कोकीतकर सर्व ग्रामपंचायत सदस्य, सेवासंसंथा,तरूण मंडळाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. या शिबीरत रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन लोकमत व देवरवाडी ग्रामपंचायती मार्फत करण्यात आले आहे.
No comments:

Post a Comment