भाडेवाढीबाबत कोवाडमध्ये मालवाहतूक धारकांचा गाड्या बंद ठेऊन संप - चंदगड लाईव्ह न्युज

14 July 2021

भाडेवाढीबाबत कोवाडमध्ये मालवाहतूक धारकांचा गाड्या बंद ठेऊन संप

भाडेवादीबाबत पुकारण्यात आलेल्या बंद मुळे सर्वच्या सर्व गाड्या रत्यावर थांबून होत्या.

कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

        दिवसागणिक  होत असलेली इंधनवाढ व वाढती महागाई या पार्श्वभूमीवर  मालवाहतूक करणाऱ्या गाडी धारकांनी कोवाड (ता. चंदगड) येथे भाडेवाढीबाबत एक दिवसाचा बंद पुकारून मालवाहतूक भाड्यामध्ये वाढ करत असल्याचे संकेत दिले.

            वाढता इंधर दर तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत होणारी वाढ लक्षात घेता आजअखेर मालवाहतुक करणाऱ्या गाड्यांचे भाडे हे न परवडणारे असून कोवाड व कर्यात भागातील जवळपास पन्नास मालवाहतूक दारांनी बंदला आपली गाडी बंद ठेऊन मोठा प्रतिसाद दिला . डिझेल तसेच  जिवनावश्यक वस्तुंच्या किमतीत वाढ होत असताना  ह्या वस्तु घेऊण जाणाऱ्या गाडीचे भाडे मात्र गेली पाच वर्षे आहे तसेच आहे . भाडयामध्ये वाढ नाही आहे .त्यामुळे मेटाकुटीला आलेल्या येथील मालवाहतूक दारांनी भाडेवाढीच्या प्रश्नांकडे  सगळयांचे लक्ष वेधण्यासाठी आज निटूर रोड , कोवाड येथे सर्व मालवाहतुक गाडया दिवसभर बंद ठेवून आपला सहभाग नोंदवला.व भाडेवाढ करत असल्याचे यावेळी मालवाहतुकदार संघटनेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment