कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
ज्यावेळी दुर्गम भागातील परिस्थिती सारखी या परिसरात अवस्था होती. अशावेळी डॉ. पी. एस. पाटील यांनी वैद्यकीय सेवा सुरू केली. आता त्यांची दुसरी पिढी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून कार्यरत आहे. आता या नव्या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. डॉ. पी. एस. पाटील यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचे कार्य कौतुकास्पद आणि आदर्शवत असेच आहे, असे मत आमदार शिवाजी पाटील यांनी व्यक्त केले.
कोवाड येथे किणी क्रॉस येथे अश्विनी नर्सिंग होम व मॅटरनिटी हॉस्पिटलचा स्थलांतर व उद्घाटन असा संयुक्त कार्यक्रम रविवारी (दि. 28) झाला. यावेळी आमदार पाटील बोलत होते.
या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, काँग्रेसचे नेते एम. जे. पाटील, माजी जि. प. सदस्य कलाप्पा भोगण, किणी कर्यात शिक्षण संस्थेचे चेअरमन अशोकराव देसाई, किणीचे सरपंच संदीप बिर्जे, माजी जि. प. सदस्य सुजाता पाटील, शिनोळी बुद्रुकचे उपसरपंच पुंडलिक कोकीतकर होते.
हॉस्पिटलचे संचालक डॉ. पी. एस. पाटील, डॉ. अमोल पाटील, संचालिका डॉ. वृषाली पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत करून मनोगतामधून हॉस्पिटल तर्फे उपलब्ध होणाऱ्या सुविधांची माहिती दिली.
यावेळी बेळगाव येथील मराठा मंडळचे प्रा. डॉ. अभिजीत पाटील, दंतचिकिस्तक डॉ. प्रियंका पाटील, मिरज येथील प्रा. डॉ. प्रताप भोसले, नामदेव पाटील, ओलम शुगर्सचे डॉ. संदेश जाधव, खासदार धनंजय महाडिक युवाशक्तीचे मायाप्पा पाटील, कीर्तीकुमार देसाई, डॉ. शशिकांत किणीकर, डॉ. विचारे, डॉ. किरण बीर्जे, इस्लामपूर येथील नगरसेवक डॉ. संग्राम पाटील, आर. एम. पाटील, लता पाटील, उपस्थित होते.
रूपा बिर्जे, हॉस्पिटलचे फार्मासिस्ट सुबराव बिर्जे, शिक्षक अनिल बिर्जे, हॉस्पिटलचे लॅब टेक्निशियन सतीश भरमनावर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक पांडुरंग जाधव व भगवान जोशीलकर यांनी आभार मानले.

No comments:
Post a Comment