चंदगड / राजेंद्र शिवणगेकर
चंदगड तालुक्यातील जिल्हा परिषद अंतर्गत ४ गट व पंचायत समितीचे ८ गण यांच्यासाठी पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेची मतमोजणी उद्या (दि. ९ फेब्रुवारी २०२६) रोजी सकाळी दहा वाजल्यापासून करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही मतमोजणी एकूण १६ फेऱ्यांमध्ये पार पडणार असून टेबलनिहाय सुस्पष्ट व पारदर्शक पद्धतीने मतमोजणी केली जाणार आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे व तहसीलदार राजेश चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
या मतमोजणी प्रक्रियेसाठी अडकूर, गवसे, माणगाव, कोवाड, कुदनूर, तुर्केवाडी, तुडये व हेरे या सर्व गट व गणांतील मतदान केंद्रांची स्वतंत्र टेबलनिहाय मांडणी करण्यात आली आहे.
चंदगड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी एकूण १०९२६० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
मतदान प्रक्रिया शांततेत, पारदर्शक व सुरळीत पार पडली असून कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही.
मतमोजणी प्रक्रिया 16 फेऱ्यात पार पडणार आहे —
प्रत्येक फेरीत वेगवेगळ्या टेबलवर स्वतंत्र मतदान केंद्रांची मोजणी
प्रत्येक गट व गणासाठी स्वतंत्र फेरी नियोजन
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमधील (EVM) मते क्रमाक्रमाने मोजली जाणार
जिल्हा परिषद गट
चंदगड तालुक्यातील जिल्हा परिषद अंतर्गत खालील ४ गटांमध्ये खालील क्रमानुसार मतमोजणी होणार आहे —
1. अडकूर
2 माणगाव
3 कुदनूर
4 तुडये
पंचायत समिती अंतर्गत खालील ८ गणांमध्ये मतमोजणी होणार —
गवसे, अडकूर, माणगाव, कोवाड, कुदनुर, तुर्केवाडी, तुडये, हेरे या क्रम पद्धतीने मतमोजणी होणार असून मतमोजणीसाठी फेरी 1 ते फेरी 16 अशी सुसंगत फेरी आखणी करण्यात आली असून प्रत्येक टेबलवर ठरावीक मतदान केंद्रांची मते मोजली जाणार आहेत.
यामुळे मतमोजणी प्रक्रियेत वेग, अचूकता व पारदर्शकता राखली जाणार आहे.मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही कॅमेरे, अधिकारी-कर्मचारी तैनाती, निवडणूक निरीक्षकांची उपस्थिती, तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर तत्काळ अधिकृत निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
चंदगड तालुक्यातील राजकीय समीकरणे ठरवणारी ही निवडणूक असल्याने मतमोजणीच्या निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. उद्या दुपारनंतर निकालाचे स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे.

No comments:
Post a Comment