कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
किणी (ता. चंदगड) येथे गणेशोत्सवानिमित्त जय कलमेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाने गेली २१ वर्षे सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक प्रबोधन पर व्याख्याने, आरोग्य शिबिरे, आयोजित करण्याबरोबरच सामाजिक सलोखा जपण्याचे काम केले आहे. गाव व परिसरातील कलाकार, विद्यार्थी, खेळाडू यांना आपले कौशल्य सादर करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याचा मंडळाचा प्रयत्न राहिला आहे. यावर्षीही मंडळाच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धांचे नियोजन व बक्षीसे पुढील प्रमाणे बुधवार दि १६ रोजी खुल्या गटासाठी रांगोळी स्पर्धा (संस्कार भारती) विजेत्यांना अनुक्रमे रोख बक्षीसे रुपये २०००, १५००, १०००, ७५० व ५००. गुरुवार दि. १७ रोजी ३५ किलो वजनी गट कबड्डी बक्षीसे रु. २०००, १५००, १००० व ५००. शुक्रवार दि. १८ रोजी खुल्या गटातील भाषण स्पर्धा असून भाषणाचे विषय - कृत्रिम बुद्धिमत्ता (A I ) प्रगती कि आव्हान, भारतीय संस्कृतीचे जतन आणि आधुनिकतेचा स्वीकार, स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान आणि आजचा भारत, सेंद्रिय शेती काळाची गरज, बेरोजगारी आणि महागाईचे दुहेरी संकट, बक्षिसे- २५००, २०००, १५००, १००० व ७००. शनिवार दि १९ रोजी खुल्या भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा. बक्षीसे रु. ७०००, ५०००, ३०००, २०००, १०००, ७०० व ५००. मंगळवार दि. २२ रोजी खुल्या गटासाठी मॅरेथॉन स्पर्धा बक्षिसे रु. २०००, १५००, १०००, ७००, ५०० व ४००. तसेच बुधवार दि २३ रोजी खुल्या गटात चित्रकला स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत विषय- गणेशोस्तव मिरवणूक, गणेशोत्सव तयारी व सजावट व गणेशोत्सव कार्यशाळा बक्षिसे- रु. १०००, ७००, ५०० व ४०० असून प्रकारातील विजेत्यांना गौरव चिन्ह देण्यात येणार आहे.अधिक माहितीसाठी पुढील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मंडळामार्फत करण्यात आले आहे.
९४२०४५९३७९ /८३८७८८१९९५० /९७६३८६३५२५ / ७६६६८४३६४८

No comments:
Post a Comment