चंदगड : सी एल वृत्तसेवा
सुंडी (ता. चंदगड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आदर्शमाता कै रामाक्का गुंडू संतू-पाटील यांच्या २५ व्या स्मृती दिनानिमीत त्यांचे सुपुत्र मारुती व डॉ. अशोक पाटील परिवारातर्फे पन्नास हजार रुपये किंमतीचा संगणक भेट दिला. यावेळी गावातील सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
गावातील निवृत्त मुख्याध्यापक प्रकाश विठोबा पाटील व त्यांच्या पत्नी आदर्श शिक्षिका सौ शामला पाटील यांना शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल आदर्श माता-पिता पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविका, मदतनीस, शालेय पोषण आहार ठेकेदार यांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे नियोजन शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष सुबराव पाटील विद्यमान अध्यक्ष उत्तम पाटील यांनी केले. यावेळी निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी गुंडू कांबळे यांनी मनोगतात आपण सर्वजण समाजाचे काहीतरी देणे लागतो. मिळवलेल्या उत्पन्नातील काही वाटा गरजूं साठी दान दिला तर त्यातून मिळणारा आनंद हा अवर्णनीय असतो. याच भावनेने पाटील कुटुंबाने हा कार्यक्रम आयोजित करून समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. हा आदर्श ठेवून मदत केल्यास शाळेचा दर्जा उंचावण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक रोहिदास परशराम पाटील, शिक्षक शिवाजी गोपाळ यळूरकर, विश्वनाथ रामचंद्र पाटील, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

No comments:
Post a Comment