![]() |
| के. आर. पाटील |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील रहिवाशी कल्लाप्पा रामू पाटील- निंगापगावडे (के. आर. पाटील) वय ५७ यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले.
कल्लाप्पा पाटील हे त्यांचे भाचे व चकोते प्रॉडक्ट्स चे वितरक भरमू गायकवाड यांच्यासोबत मालाचे वितरण करण्यासाठी रविवार दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी पाटणे फाटा परिसरात गेले होते. सावंतवाडी रोडवरील माणगाव फाटा जवळील दुकानांतून माल उतरवून परत निघत असताना सायंकाळी साडेपाच च्या सुमारास अचानक त्यांच्या छातीमध्ये कळ आली. हृदयविकाराच्या धक्क्याचे लक्षण दिसताच जवळपासचे नागरिक व दुकानदार यांनी रुग्णवाहिका बोलावून त्यांना बेळगाव येथे उपचारासाठी पाठवले. रविवार असल्याने बेळगाव येथील बहुतांश हॉस्पिटल बंद असल्याने उपचारासाठी काहीसा वेळ झाला. परिणामी खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
मनमिळावू व अजातशत्रू व्यक्तिमत्व असल्याने त्यांचा मित्रपरिवार फार मोठा होता. तसेच हसती खेळती व्यक्ती आपल्यातून अचानक निघून गेल्याने गाव व परिसरावर शोककळा पसरली. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या दुःखद घटनेमुळे गावातील अनेक धार्मिक व सामाजिक कार्यक्रम रद्द करण्यात आले. अंत्यविधीला ग्रामस्थ, परिसरातील मान्यवर व नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.
त्यांच्या पश्चात पत्नी, अविवाहित मुलगी, मुलगा व मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी दि. १० रोजी होणार आहे.

No comments:
Post a Comment