![]() |
| मुरगाव गोवा नगरपालिका सफाई कामगारांना राख्या बांधून सन्मान करतांना मान्यवर |
दक्षिण गोव्यातील अरबी समुद्रकिनाऱ्यावरील मुरगाव नगरपालिकेच्या सफाई कामगारांसाठी येथील नागरिकांनी रक्षाबंधन या भावपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले. येथील श्री दत्तात्रेय सेवा धाम मंदिरात दि. ०७ सप्टेंबर २०२६ रोजी हा उपक्रम पार पडला.
मंदिराचे श्रमदाता स्वराज्य रक्षक छ. संभाजी महाराज पुतळा कमिटीचे संस्थापक अध्यक्ष अजित कांबळी व मान्यवर श्रमदात्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रम प्रसंगी मुरगाव (संभाजीनगर) परिसराची अहोरात्र स्वच्छता राखणाऱ्या सफाई कामगारांची मंदिर भक्त भगिनींनी आरती ओवाळून राख्या बांधल्या. या कार्यातून येथील श्रमदात्या भगिनींनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला असून त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

No comments:
Post a Comment