चंदगड / प्रतिनिधी :
स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियान (२.०) अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून चंदगड नगरपंचायतीस अत्याधुनिक मैला उपसा वाहन (Suction Vehicle) उपलब्ध करून देण्यात आले आहे. या वाहनामुळे शहरातील सेप्टिक टँक तसेच मैला उपसा करण्याची सुविधा अधिक प्रभावी व सुलभ होणार असून, शहराच्या स्वच्छता व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.
या वाहनाचे पूजन नगराध्यक्ष सुनील काणेकर, उपनगराध्यक्ष, नगरसेवक-नगरसेविका, विविध पदाधिकारी, नगरपंचायत कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील सेप्टिक टँकची नियमित स्वच्छता, मैला उपसा व विल्हेवाट व्यवस्थापन अधिक कार्यक्षमपणे करण्यासाठी हे वाहन उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षितता वाढण्यासोबतच चंदगड शहर अधिक स्वच्छ व निरोगी ठेवण्यास मदत होणार आहे.
चंदगड नगरपंचायतीच्या वतीने नागरिकांनी या सुविधेचा योग्य प्रकारे लाभ घ्यावा आणि शहराच्या स्वच्छतेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी मुख्य अधिकारी, नगराध्यक्ष सुनील काणेकर, उपनगराध्यक्ष आयेशा नाईकवाडी, नगरसेवक अबुजर मदार, सचिन सातवणेकर, अजिंक्य पिळणकर, नवीद अत्तार, प्रमोद कांबळे, सुधीर पिळणकर, सुभाष गावडे, संजय चंदगडकर, भास्कर भाई कामत, नामदेव मांगले, अनिल कट्टी, समीर नाईकवाडी, श्रीधन दड्डीकर सर्व नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी व चंदगड ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:
Post a Comment