चंदगड / प्रतिनिधी :
सोमवारी (दि. ७) पन्हाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी चंदगड पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदाची सूत्रे स्वीकारली. चंदगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक निंगाप्पा चौखंडे यांची पन्हाळा पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी बदली करण्यात आली.
नव्याने पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी चंदगड तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास तसेच गुन्हेगारीला आळा घालणार असे सांगितले.
"तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून आवश्यक ती कठोर कारवाई केली जाईल. सर्वसामान्य नागरिकांसाठी भयमुक्त वातावरण करू.

No comments:
Post a Comment