
गोवा येथे राजाराम पाटील यांच्या घरी श्रावण मासानिमित्त गोवा शिप यार्डच्या इंजिनियर व कर्मचाऱ्यांनी भजन सादर केले. याप्रसंगी पाटील कुटुंबीयांसमवेत गोवा शिपयार्डचे अधिकारी व कर्मचारी
मडगाव : सी एल वृत्तसेवा
गोवा शिपयार्ड लिमिटेड (भारत सरकारचा सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या जहाज बांधणी उद्योगातील तरुणांनी देशाच्या सागरी सुरक्षेची धुरा सांभाळत असतानाच आपल्या सांस्कृतिक वारसा तितक्याच ताकदीने जपला आहे. याचे प्रत्यंतर नुकतेच वास्को येथील 'शिवशंभो भजनी मंडळ नवेवाडेनगर' सांकवाळ येथे पाहायला मिळाले.
गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL) मधील कर्मचाऱ्यांनी केवळ जहाजांची बांधणीच नव्हे, तर भक्तीच्या सुरांतून सांस्कृतिक वारसा जपण्याची अनोखी परंपरा कायम ठेवल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. शिवशंभो भजनी मंडळ नवेवाडेनगर, संभाजीनगर (वास्को) यांच्या वतीने गुरुवार, दिनांक ०३ सप्टेंबर २०२६ रोजी सांकवाळ येथील विद्यानगर, सूर्या कॉलनी निवासस्थानी असलेल्या राजाराम पाटील यांच्या घरी श्रावण महिन्यातील गुरुवार निमित्ताने एका विशेष भजनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे, यात सहभागी गोवा शिपयार्डमधील भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील या अग्रगण्य जहाज बांधणी उद्योग समूहामध्ये कार्यरत असलेले सचिन करलकर, श्रीधर परब, अमित तांबे, यशवंत सावंत, प्रविण सावंत, लक्ष्मण नाईक, गौरव खानविलकर, श्रीकृष्ण सावंत, संदेश गावडे, भूषण पंडित, अजित गावस, संकेत गावडे, रत्नाकर वालावलकर, शंकर राऊळ, दीपक राऊळ आणि मयूर गाडे या युवा कर्मचाऱ्यांनी आपल्या सुरेल स्वरांनी आणि लयबद्ध पदांनी उपस्थितांची मने जिंकली. एका बाजूला अत्याधुनिक जहाजांच्या निर्मितीचे कठीण तंत्रज्ञान आणि दुसऱ्या बाजूला परंपरा जपणारी भक्तिभावयुक्त भजन संस्कृती असा हा सुंदर मेळ उपस्थितांसाठी पर्वणी ठरला.
यावेळी भजनी कलाकार सचिन करलकर यांच्या भजन क्षेत्रातील योगदानाचा सन्मान करण्यात आला. धनलक्ष्मी हॉटेलचे मालक परशुराम हरिजन, तिरुपती सहकारी संस्थेचे शाखा समन्वयक विष्णू चव्हाण यांच्या हस्ते सचिन यांना गौरवण्यात आले. या प्रसंगी पद्माकर वांजळे (वरणापूरी), रवी बच्चनहट्टी (चिखली), महादेव मुतगेकर (दाबोली), देवराज राणे (झुआरीनगर) आणि परशराम शेनोळकर (वेलसाव) आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन करून राजाराम पाटील (शिव चातुर्यदिन- गरुडझेप मोहीम चे गोवा प्रदेशाध्यक्ष) यांनी कलाकारांचे सहर्ष स्वागत केले. शेवटी सर्व गुणी कलाकार आणि उपस्थितांचे पाटील कुटुंबियांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment