
कालकुंद्री येथे प्रारुप मतदार यादी वाचन प्रसंगी बीएलओ आणि मतदार, ग्रामस्थ
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 'एसआयआर 2026' अंतर्गत प्रारूप मतदार याद्या चंदगड तालुक्यात आज प्रसिद्ध करण्यात आल्या. गडहिंग्लज उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे व चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील बी एल ओ यांनी आपापल्या गावी ग्रामपंचायत व सार्वजनिक ठिकाणी प्रारूप मतदार यादी वाचन केले. याला विविध गावातून मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला.
कालकुंद्री येथील ग्रामपंचायत कार्यालयात बी एल ओ कोमल विलास शेटजी (यादी भाग क्रमांक २९१), बी. ए. तुपारे (यादी भाग २९२) व अभिजित अरविंद कुंभार (यादी भाग २९३) यांनी ग्रामस्थांच्या मदतीने याद्यांचे वाचन केले. यावेळी ग्रामसेवक ओंकार दिवेकर, पत्रकार श्रीकांत पाटील, चंद्रकांत पाटील, अनंत कोकितकर, सुरेश पाटील, कर्मचारी सागर पाटील, उदय सुतार, शशिकांत सुतार, फकीरा लोहार, नरसू कांबळे आदींची उपस्थिती होती.
नाव वगळलेल्या मतदारांना अद्यापही संधी
अंतिम यादीत नाव नोंदवण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत
निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) अंतर्गत प्रारूप मतदार यादीतून राज्यातील तब्बल २ कोटी ७ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. जर तुमचे नाव या प्रारूप यादीत नसेल, निवडणूक आयोगाने नागरिकांना त्यांचे नाव पुन्हा समाविष्ट करण्यासाठी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ पर्यंतची मुदत दिली आहे. या १ महिन्याच्या कालावधीत नागरिक आपले दावे आणि हरकती नोंदवू शकतात. यादीत नाव कसे तपासावे?सर्वात आधी मुख्य निवडणूक अधिकार्यांच्या (CEO) अधिकृत संकेतस्थळावर किंवा निवडणूक आयोगाच्या voters.eci.gov.in या पोर्टलला भेट देऊन ड्राफ्ट रोलमध्ये तुमचे नाव आहे की नाही, याची खात्री करा.
तुमचे नाव यादीत नसेल, तर ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी फॉर्म नंबर ६ भरून आवश्यक कागदपत्रांसह आपले नाव पुन्हा जोडण्यासाठी दावा सादर करा.आक्षेप नोंदवण्यासाठी (फॉर्म ७)एखाद्या अपात्र किंवा मृत व्यक्तीचे नाव चुकून यादीत आले असल्यास त्यावर आक्षेप घेण्यासाठी फॉर्म नंबर ७ चा वापर करा. दुरुस्ती किंवा पत्ता बदलण्यासाठी (फॉर्म ८) मतदार ओळखपत्रातील नावाचे स्पेलिंग दुरुस्त करणे, पत्ता बदलणे किंवा इतर सुधारणांसाठी फॉर्म नंबर ८ भरावा लागेल. यादीत नाव नसल्यास १४ पैकी पुरेसे पुरावे सादर करावे लागतील.
No comments:
Post a Comment