जिल्हास्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेसाठी चंदगडच्या दोन संघांची दिमाखदार निवड!, दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भु. पाटील ज्युनि. कॉलेजचे घवघवीत यश - चंदगड लाईव्ह न्युज

18 September 2026

जिल्हास्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेसाठी चंदगडच्या दोन संघांची दिमाखदार निवड!, दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भु. पाटील ज्युनि. कॉलेजचे घवघवीत यश

 


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

 राजगोळी येथे संपन्न झालेल्या शालेय तालुकास्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेत दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भु. पाटील ज्युनि. कॉलेज, चंदगडच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. १७ वर्षे वयोगटातील मुलांचा संघ तसेच १९ वर्षे वयोगटातील मुलींचा संघ यांनी प्रथम क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली.

१७ वर्षे वयोगटातील मुलांच्या विजयी संघात सिद्देश सुकये, आयुष जाधव, विपुल कडूकर, घोषित पिळणकर, आदित्य कांबळे, समर्थ लोहार, सक्षम शिरगे, रोहन कुंभार, गंधर्व कुंभार, धीरज फाटक व रणवीर आनंदाचे यांनी सहभाग घेतला.

१९ वर्षे वयोगटातील मुलींच्या विजयी संघात जैनब मुल्ला, संचिता पाटील, शर्वरी मुंगारे, आदिती मेंगुलकर, दिशा गावडे, दीपाली इंगवले, सुनिता पाटील व संस्कृती गायचारे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

या दोन्ही संघांना क्रीडा शिक्षक प्रा. एन. डी. हदगल व श्री. टी. व्ही. खंदाळे यांचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शालेय समिती चेअरमन ॲड. प्रा. एन. एस. पाटील, प्राचार्य श्री. आर. पी. पाटील, उपप्राचार्य टी. एस. चांदेकर व पर्यवेक्षक एस. एल. बेळगावकर यांनी विजयी खेळाडू, मार्गदर्शक शिक्षक व क्रीडा विभागाचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment