गडहिंग्लज विभागात ओलमकडून सर्वाधिक साडेपाच लाख मेट्रीक टन गाळप - युनिड हेड एन. रविश यांची माहिती, राजगोळी खुर्द येथे गळीत हंगाम सांगता समारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

27 February 2026

गडहिंग्लज विभागात ओलमकडून सर्वाधिक साडेपाच लाख मेट्रीक टन गाळप - युनिड हेड एन. रविश यांची माहिती, राजगोळी खुर्द येथे गळीत हंगाम सांगता समारंभ

राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम साखर कारखान्याच्या सांगता समारंभ कार्यक्रमावेळी उपस्थित कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम (हेमरस) साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता आज झाली. चालू गळीत हंगामात ८ लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उध्दिष्ट निर्धारीत केले होते. पण काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने साडेपाच लाख मेट्रीक टन गाळप करण्यात यश आले. गडहिंग्लज विभागात सर्वाधिक गाळप झाल्याची माहीती कारखान्याचे युनिड हेड एन. रविश यांनी दिली. कारखान्याच्या १६ व्या गळीत हंगामाची सांगता आज झाली. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात युनिट हेड बोलत होते.

        ते पुढे म्हणाले, `` चालू गळीत हंगामात कारखान्याची गाळप क्षमता वाढवली होती. त्यामुळे ८ लाख मेट्रीक टन गाळपाचे उदिष्ट निश्चित केले होते. पण काही तांत्रिक अडचणी वेळोवेळी निर्माण झाल्या. तसेच एकरी उत्पादनात झालेली घट, बदलत्या हवामाना ऊस पिकांवर झालेला परिणाम झाला आहे. त्यामुळे गाळपाचे उदिष्ट पुर्ण करता आले नसले तरी गडहिंग्लज विभागात सर्वांधिक ऊस गाळपाचा टप्पा पुर्ण करण्यात यश आले, असे सांगून एन. रविश यांनी गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, तोडणी मजूर व वाहतुकदारांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केल्याने गळीत हंगाम समाधानकारक पुर्ण करता आल्याचे सांगितले. 

    यावेळी शेती अधिकारी संग्राम पाटील म्हणाले, ``कारखाना प्रशासनाने चालू गळीत हंगामातील गाळप झालेल्या ऊसाची बिले १५ दिवसात अदा करुन कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. वाहतुक व तोडणी दारांची बिलेही त्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहेत. असे सांगून पुढील हंगामात शिस्तबध्द नियोजन करुन ८ लाख टन ऊसाचे गाळप करण्याचा विश्वास व्यक्त केला.``

    सांगता समारंभ कार्यक्रमाला व्यवस्थापक महेश भोसले, सहाय्यक व्यवस्थापक श्रीशैल एच, श्रीकांत ए, अनिल पाटील, नामदेव पाटील, भागोजी लांडे, रमेश पाटील, गणपत पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते

    यावेळी कारखान्याची गाळप क्षमता वाढवली होती. पण तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने तसेच एकरी उत्पादनात घट आल्याने निर्धारीत गाळपाचे उध्दिष्ट  पुर्ण करता आले नाही तरी गडहिंग्लज विभागात सर्वांधिक ऊस गाळप ओलमने केला आहे. याचे सर्वस्व यश हे शेतकरी कामगार, तोडणी मजूर व ऊस वाहतुकदार यांच्या सहकारामुळे साडेपाच लाख ऊस गाळपाचा टप्पा पार करता आल्याचे बिझनेस हेड टी. कन्नन यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment