![]() |
| सायली वरपे |
चंदगड / प्रतिनिधी :--
रामपूर (ता. चंदगड) येथील कुमारी सायली बाबुराव वरपे हिने बी. टेक. (ए.आय.एम.एल.) इंजिनिअरिंग परीक्षेत उज्वल यश. डॉक्टर डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज कसबा -बावडा, कोल्हापूर ची विद्यार्थिनी कुमारी सायली वरपे हीने बी. टेक. इंजिनिअरिंग ए. आय. एम. एल. फायनल परीक्षेत ९४% गुण मिळवून विशेष प्राविण्यासह पदवी प्राप्त केली.
यामध्ये मुंबई आय. आय. टी. व इन्फोसिस कंपनीला विविध विषयांवर प्रोजेक्ट सादर केले आहेत. वेबसाईट वर्क्समध्ये उत्कृष्ठ वेब डेव्हल्पर म्हणून सहा महिन्याची इंटर्नशीप पूर्ण केली. आवडत्या विषयांवर पेंटींग व वक्तृत्व विषयांतही अनेक बक्षिसे मिळवली आहेत. नुकत्याच लागलेल्या बी. टेक. ए. आय. एम. एल. इंजिनिअरिंग परीक्षेत तीला ६२५ पैकी ५८५ गुण मिळवून अव्वल श्रेणीत उतीर्ण झालेने तीचे कौतुक होत आहे. प्राथमिक शिक्षक बाबुराव वरपे यांची ती कन्या आहे.


No comments:
Post a Comment