चंदगड : सी एल वृत्तसेवा
आजीच्या अंत्यविधीसाठी आलेल्या तीन शाळकरी मुलींचा हुंदळेवाडी येथे किणी गावच्या हद्दीवर शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी (दि. २५) सायंकाळी ५ वाजता घडली.
किणी हद्दीवरील दीपक पृथ्वीराज देसाई (रा. किणी) यांच्या मालकीच्या शेततळ्यामध्ये ही दुर्घटना घडली. धनुष्का पुंडलिक सांबरेकर (वय १५, आंबेवाडी, बेळगाव व सध्या रा. पर्वरी, गोवा ), रिया चंद्रकांत सांबरेकर (वय १२, आंबेवाडी, ता. बेळगाव सध्या रा. पर्वरी, गोवा) व
स्वरा जयवंत नाईक (वय १३, मुळगाव होसूर, ता. चंदगड सध्या रा. जानकी नगर उचगाव पूर्व ता. करवीर, कोल्हापूर ) या तीन मुलींचा बुडून मृत्यू झाला.
धनुष्का व रिया या दोघी सख्ख्या चुलत बहिणी असून व स्वरा ही या दोन मुलींची आत्येबहिण होती.
रिया व धनुष्का हिच्या वडिलांच्या मातोश्री व स्वरा हिच्या आईच्या मातोश्री सुशीला सांबरेकर (वय 70, मुळगाव आंबेवाडी, माहेर हुंदळेवाडी) यांचे आठ निधन झाले आहे. या मुलींच्या नात्याने आजी लागणाऱ्या सुशीला यांचे विधीकार्य करण्यासाठी या तिन्ही मुली आल्या होत्या. त्या खेळत खेळत रियाचा भाऊ रिषभ असे चौघेजण गेले होते. रिषभने
त्या तीन मुली पोहताना दिसत नसल्याचे तेथे आलेल्या पुंडलिक मोहनगेकर यांना सांगितले. यानंतर पुंडलिक यांच्यासह राहुल जाधव व दीपक कुंभार या तिघा जणांनी या तीन मुलींना तळ्याबाहेर काढले. मात्र याआधीच दुर्दैवाने त्या तिघींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.



No comments:
Post a Comment