कानूर खुर्द येथील मल्लनाथ हायस्कूलचे दहावीचे विद्यार्थी ३३ वर्षांनी आले एकत्र, जुन्या आठवणींना दिला उजाळा - चंदगड लाईव्ह न्युज

16 May 2026

कानूर खुर्द येथील मल्लनाथ हायस्कूलचे दहावीचे विद्यार्थी ३३ वर्षांनी आले एकत्र, जुन्या आठवणींना दिला उजाळा

  


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

कानूर खुर्द (ता. चंदगड) येथील मल्लनाथ हायस्कूल  बॅच ९३ - ९४ च्या दहावी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा ३३ वर्षांनी हॉटेल निसर्ग येथे मोठया उत्साहात संपन्न झाला.

सरस्वती पुजानाने सुरवात कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर दिवंगत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहिन्यात आली.   माजी विद्यार्थी यांनी शाळेबद्दल आपले अनुभव कथन करून, संगीत खुर्ची, गायन स्पर्धा, बालपणीच्या आठवणी असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. सुलभा बांदेकर, सुनीता गावंडे, ननिता गावंडे, रेखा आगलावे यांनी गीत सादर केले.

गुंडू सुतार यांनी सर्वांना ३४ वर्षांनी एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतला. या स्नेहसंमेलनात महादेव तेजम, पांडुरंग कांबळे, गुंडू सुतार, सुनील झेंडे, सुरेखा वणारी, सुलभा बांदेकर, अनिल मोरे, विजया शिरोडकर, विद्या गनाचारी, सुनंदा पाटील - जांबरेकर, दादू सुळगावकर, ननिता गावडे, रेखा आगलावे, धनाजी गावडे, दिलीप देसाई, पुष्पा सुतार, दत्तू काळमावाडकर, विलास शिरोडकर आदी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. 

या निमित्ताने संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली. महिला विभागात ननिता गावडे प्रथम क्रमांक, विद्या गणाचारी दुसरा क्रमांक, तृप्तीय क्रमांक विजया शिरोडकर तर पुरुष विभागामध्ये दादू सुलगावकर, पांडुरंग कांबळे, अनिल मोरे यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले. सुनील झेंडे यांनी सूत्रसंचालन तर विजया शिरोडकर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment