तिलारी घाट : दुचाकीवरील नियंत्रण सुटून अपघात; सिंधुदुर्गातील २४ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

23 November 2026

तिलारी घाट : दुचाकीवरील नियंत्रण सुटून अपघात; सिंधुदुर्गातील २४ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

    तिलारी घाटात दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साटेली-भेडशी येथील २४ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अखिल जोसेफ चालिल (वय २४, रा. साटेली, भेडशी, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग) असे मृत युवकाचे नाव आहे.

       यासदंर्भात चंदगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.१५ वाजण्याच्या सुमारास तिलारी घाटातील वीजघरापासून पुढे दक्षिणेकडे अंदाजे एक किलोमीटर अंतरावर कोदाळी (ता. चंदगड) येथे हा अपघात घडला. अखिल चालिल हे बेळगावहून पाटणे फाटा मार्गे तिलारी घाटातून जात असताना त्यांच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ते रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. जखमी अखिल यांना उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेज, बांबोली येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना २३ नोव्हेंबर २०२६ रोजी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद चंदगड पोलीसात झाली आहे. पुढील तपास पो. हे. कॉ. श्री. बांबळे करत आहेत. 

No comments:

Post a Comment