![]() |
| तुकाराम पाटील |
मलतवाडी (ता. चंदगड) येथील ज्येष्ठ नागरिक, निवृत्त शिक्षक व दौलत साखर कारखान्याचे माजी संचालक तुकाराम रामचंद्र पाटील (वय ८९) यांचे शुक्रवारी (१५ मे २०२६) सकाळी १०:३० वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
कोवाड येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या कला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक, महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स निवड समितीचे सदस्य व शिवाजी युनिव्हर्सिटी शारीरिक शिक्षण संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा. आर. टी. पाटील व प्रगतशील शेतकरी नरेंद्र पाटील यांचे ते वडील होय. नागरदळेचे सुपुत्र व मुंबई पोलीस हवालदार सुभाष पाटील यांचे ते सासरे होत. तर आंतरराष्ट्रीय रग्बी खेळाडू वल्लभ पाटील यांचे ते आजोबा होत.

No comments:
Post a Comment