तिलारी घाटाच्या धोकादायक वळणावर सिमेंट केमिकल वाहतूक करणारे अवजड वाहन अडकून वाहतूक ठप्प प्रवाशांचे हाल खाजगी वाहने तेरवण मेढे पर्याय मार्गाने वळवली - चंदगड लाईव्ह न्युज

16 May 2026

तिलारी घाटाच्या धोकादायक वळणावर सिमेंट केमिकल वाहतूक करणारे अवजड वाहन अडकून वाहतूक ठप्प प्रवाशांचे हाल खाजगी वाहने तेरवण मेढे पर्याय मार्गाने वळवली

 


दोडामार्ग, दि. १६ मे प्रतिनिधी

तिलारी घाट हा अवजड वाहने यासाठी धोकादायक आहे. या अवजड वाहनांमुळे अनेक अपघात घाट बंद होणे सारख्या घटना घडल्या. अवजड वाहने बंदी असताना पोलिसांकडून कारवाई होत नाही गोवा येथे जवळच्या मार्गाने जाण्यासाठी परराज्यातील अवजड वाहने तिलारी घाटातून जातात. अशा प्रकारे सिमेंट केमिकल भरलेले अवजड वाहन घाटाच्या धोकादायक पहिल्या वळणावर अडकून राहिला नशीब बलवत्तर म्हणून अडकून राहिला नाही तर खोल दरीत पडला असता या वाहनांमुळे तिलारी घाटातून वाहतूक बंद होऊन अनेक जण अडकून पडले प्रवाशांचे हाल झाले. चार चाकी खाजगी वाहने तेरवण मेढे पर्यायी मार्ग वळवली.

  तिलारी घाटातून गोवा जवळ यामुळे अनेक परराज्यातील अवजड वाहने तिलारी घाट रस्ता वापर करतात पण या चालकाना घाटाचा अनुभव नाही यामुळे अपघात वाढले आहेत. चंदगड पोलीस बांधकाम विभाग चंदगड यांनी मध्यंतरी ही वाहने बंद केली होती सूचना फलक लावले होते. पण पुन्हा एकदा अवजड वाहने तिलारी घाटातून सुरू झाली आहेत यामुळे वाहतूक ठप्प होत आहे. 

  शनिवारी पहाटे परराज्यातील अवजड वाहन टॅंकर सिमेंट केमिकल भरून धोकादायक घाटातून उतरत असताना पहिल्या धोकादायक वळणावर हे वाहन कठडयाला धडकून अडकून पडले. नशीब बलवत्तर म्हणून हे वाहन दरीत कोसळता कोसळता वाचला.

वळणावर हे वाहन अडकून तिलारी घाटातून वाहतूक ठप्प झाली चार चाकी वाहने देखील अडकून पडली. 

दोडामार्ग येथून बेळगाव कोल्हापूर, जाणाऱ्या बसेस बेळगाव कोल्हापूर दोडामार्ग पणजी जाणाऱ्या बसेस अडकून पडले. यामुळे मोठया प्रमाणात प्रवासी वर्ग गैरसोय झाली. तर काही खाजगी चार चाकी वाहने यांनी माघारी फिरत तेरवण मेढे पर्यायी मार्ग वापर केला तर काही जण बांदा मार्गे गेले. 

तिलारी घाटातून अवजड वाहने पुन्हा सुरू झाली आहेत. याचा फटका लोकांना बसत आहे. तेव्हा तिलारी घाटातून अवजड वाहने कायमस्वरूपी बंद करावी अशी मागणी केली जात आहे. 

No comments:

Post a Comment