
सडा- मुरगाव, गोवा येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त अभिवादन प्रसंगी मान्यवर
चंदगड : सी एल वृत्तसेवा
स्वराज्याचे धाकटे धनी, छत्रपती संभाजी महाराज यांची ३६९ वी जयंती गोवा राज्यात ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सालाबादप्रमाणे यंदाही श्रमदानातून श्री दत्तात्रेय सेवा धाम मंदिर उभारलेल्या मावळ्यांनी बामणाव्हळी, सडा- मुरगाव (गोवा) येथे सेवाधाम च्या आवारात उभारण्यात आलेल्या स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजाच्या पुर्णाकृती पुतळ्यास दुर्गाभिषेक करून पूजन करण्यात आले. यावेळी विविध लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात आले.
या शानदार सोहळ्यास प्रवीण चौधरी (निवृत्त नौदल अधिकारी), सुधीर दुबल (उद्योजक व निवृत्त नौदल अधिकारी), महादेव मुतगेकर (उद्योजक), राजाराम पाटील (शिवप्रेमी), बलराम बेटगीरी (मराठा महासंघ गोवा प्रमुख) संस्थानचे प्रमुख अजित कांबळी व श्रमदान सहकारी उपस्थित होते.
शिवप्रेमी आजित पार्सेकर यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. अजित कांबळी यांनी प्रस्तावना करताना सेवा धाम मंदिर उभारणी पूर्वी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा का उभारला? याचे स्पष्टीकरण देताना त्यांच्याच प्रेरणेने मंदिर उभारणीस प्रारंभ केला आणि सातत्याने पुर्णत्वास नेल्याचे नमूद केले. यावेळी तेजस्वी महादेव मुतगेकर यांनी भाषणात १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर जन्मलेल्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज शौर्याचा इतिहास उपस्थितांसमोर मांडला. प्रवीण चौधरी यांनी लेखनी आणि तलवारीत पारंगत असलेल्या या महान मराठा योध्दाचे बलिदान अमर राहीले. असे मनोगत व्यक्त केले. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
No comments:
Post a Comment