कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथे नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या कालकुंद्री (ता. चंदगड) येथील महिलेचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
म्हाळेवाडी येथील रहिवाशी व कालकुंद्री येथील सरस्वती विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक एन. आर. पाटील (वय ६५) यांचे आजारपणामुळे शनिवारी दि. १६/५/२०२६ रोजी निधन झाले. एन. आर. पाटील यांच्या अंत्यविधीसाठी त्यांच्या वहिनीची बहीण असलेल्या कालकुंद्री येथील सौ. वत्सला सूर्याजी पाटील (वय ६५) आल्या होत्या. सायंकाळी एन. आर. पाटील यांचे अंत्यदर्शन घेत असताना वत्सला यांना हृदयविकाराचा तिव्र झटका येऊन त्या खाली कोसळल्या. त्यांना तात्काळ कोवाड येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. तथापि उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. वत्सला यांच्या पश्चात पती सूर्याजी नागोजी पाटील, विवाहित सहा मुली, जावई व मुलगा असा परिवार आहे.
त्या प्राथमिक शिक्षक बँक कोल्हापूर, शाखा हलकर्णीचे मॅनेजर वाय. एस. पाटील यांच्या मामी होत. त्यांच्यावर कालकुंद्री येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

No comments:
Post a Comment