चंदगड / सी. एल. वृतसेवा
शिवाजीराव पाटील आमदार यांनी चंदगड येथील कन्या विद्या मंदिर व कुमार विद्या मंदिर या दोन शाळांचे एकत्रीकरण न करण्याची मागणी शिक्षण विभागाकडे केली आहे. याबाबत त्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, या दोन्ही शाळांना सुमारे १५० वर्षांची परंपरा असून अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. कन्या विद्या मंदिर ही मुलींची शाळा असल्याने सुरक्षित व शिस्तबद्ध वातावरणात शिक्षण मिळत असल्यामुळे पालकांचा शाळेवर अधिक विश्वास असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
चंदगड शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता दोन्ही शाळा स्वतंत्र राहणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. शासनाने शाळा एकत्रीकरणाचा निर्णय पुनर्विचार करून कन्या विद्या मंदिर व कुमार विद्या मंदिर या दोन्ही शाळा स्वतंत्र ठेवाव्यात, अशी मागणी शिवाजी पाटील यांनी केली आहे.

No comments:
Post a Comment