चंदगड येथे पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांच्या उपस्थितीमध्ये विविध शासकीय विभागांची आढावा बैठक संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

27 May 2026

चंदगड येथे पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांच्या उपस्थितीमध्ये विविध शासकीय विभागांची आढावा बैठक संपन्न

 


चंदगड / सी एल वृत्तसेवा

चंदगड तालुक्यातील विविध शासकीय विभागांची आढावा बैठक महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील (भाऊ) आणि महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.



          यावेळी कृषी, महसूल, शिक्षण, आरोग्य, वन विभाग तसेच इतर शासकीय विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

        बैठकीत घरकुल योजना, शाळांची दुरुस्ती, वन्यप्राण्यांचा बंदोबस्त, शाळा दूरुस्ती, शेतकरी यांत्रिकीकरण रखडलेले अनुदान, शेतकऱ्यांसाठी शेती कुंपण योजना, आरोग्य विभागातील विविध समस्या तसेच कंत्राटी कामगारांच्या अडचणी यावर सकारात्मक व सखोल चर्चा करण्यात आली.

         पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी चंदगडवासीयांच्या समस्या संवेदनशीलतेने ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांना पुढील ६ महिन्यांत या प्रश्नांवर प्रभावी कार्यवाही करून नागरिकांना दिलासा देण्याच्या सूचना दिल्या.

        यावेळी प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भावकु गुरव, पंचायत समिती सदस्य रवींद्र बांदिवडेकर, सौ. सुवर्णा कुंभार, सौ. मनस्विनी कांबळे, स्वप्निल इंगवले, चंदगड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सुनील काणेकर, तहसीलदार राजेश चव्हाण, गट विकास अधिकारी वृषाली यादव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सौमजाळ, चंदगड पोलिस निरीक्षक चौखंडे, शांतारामबापू पाटील, दिपक पाटील, चंद्रशेखर पाटील, जयपाल मुन्नोळी, सोमगोंडा आरबोळे, अशोक कदम, संग्रामसिंह अडकुरकर, प्रताप सुर्यवंशी, अंकुश गवस, श्रीशैल नागराळ, बसवराज कंकणवाडी, सौ. भारती जाधव, पत्रकार बांधव, आजी-माजी सैनिक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment