गोव्यात मोठ्या प्रमाणात साजरी होणार पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची दीडशे वी जयंती - चंदगड लाईव्ह न्युज

29 December 2025

गोव्यात मोठ्या प्रमाणात साजरी होणार पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची दीडशे वी जयंती

नियोजन बैठकीस उपस्थित असलेले विविध भागातील मान्यवर

 चंदगड : सी एल वृत्तसेवा 

   स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान, पोलादी पुरुष, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशे व्या जयंती वर्षात पणजी गोवा येथे रविवार दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात देशभरातील विविध प्रांत, भाषा, समुदायातील सांस्कृतिक वैशिष्ट्यांसह  खाद्यपदार्थ व विविध वस्तू यांचे प्रदर्शन करण्यासाठी विविध स्टॉल मांडण्यात येणार आहेत. 

  या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी नुकतीच पणजी येथे नियोजन बैठक पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी भारत भारतीचे महाराष्ट्र व गोवा प्रदेश मार्गदर्शक अतुलभाई शेवडे हे होते. राष्ट्रीय स्वधर्म संस्कार मंडळाच्या सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत विविध प्रांतातील प्रांत व राज्यातील सदस्यांची उपस्थिती होती. यावेळी भारत भारती स्वागत अर्चनाबेन शहा यांनी केले राष्ट्रीय एकात्मतेला समर्पित असलेल्या भारत भारती संस्थेचे विभाग प्रचारक मंदार व विभाग संपर्कप्रमुख प्रसाद यांनी मार्गदर्शन केले. या भव्य दिव्य कार्यक्रमात गोमंतकात वास्तव्य करणाऱ्या सर्व प्रांतातील विविध भाषिक समाजांना एकत्र आणण्याचा संकल्प याद्वारे करण्यात येणार आहे. या बैठकीत भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची दीड शताब्दी मोठ्या प्रमाणात करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. यावेळी विविध प्रांतातून आलेल्या मान्यवरांमध्ये अतुलभाई शेवडे, सौ अर्चनाबेन शहा,  प्रसाद विठ्ठल कामत, हरिष पुरणसिंह, प्रकाशजी शंकरजी, बसवराज, हणुमंत रेड्डी, निखिल शहा, राजाराम पाटील, मंदार कुलकर्णी, पद्माकर  वाळूंज, राजेंद्र केरकर, प्रसाद शिव सांभारे, रोहिदास आदी मान्यवर उपस्थित होते. आधुनिक भारताचे शिल्पकार, भारतरत्न, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांची जनजागृती हा या कार्यक्रमाचा एकमेव उद्देश असून नियोजनाची पुढील बैठक लवकरच पणजी येथेच घेण्यात येईल. असे यावेळी जाहीर करण्यात आले.

No comments:

Post a Comment