![]() |
| श्रीमती यशोदा दत्तू घोळसे |
चंदगड / सी एल वृत्तसेवा
लोकशाहीचा पवित्र हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडलेल्या ज्येष्ठ महिलेचा मतदान केंद्रावरच अचानक मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी मलगड (ता. चंदगड) येथे घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मतदान केंद्रावर शोककळा पसरली होती.
मलगड येथील रहिवासी श्रीमती यशोदा दत्तू घोळसे (वय ९०) या सकाळी सुमारे १०.४० वाजण्याच्या सुमारास आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर उपस्थित झाल्या होत्या. मतदान करण्याची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. उपस्थित कर्मचारी व नागरिकांनी तातडीने मदतीचा प्रयत्न केला; मात्र उपचारापूर्वीच त्यांचे दुःखद निधन झाले.
वयाच्या नव्वदीतही लोकशाहीवरील निष्ठा व कर्तव्यभावनेतून मतदानासाठी आलेल्या यशोदा घोळसे यांच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त होत आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या हृदयद्रावक घटनेमुळे काही काळ मतदान केंद्रावर शांतता व शोकाचे वातावरण पसरले होते. प्रशासनाने परिस्थितीची योग्य ती दखल घेत पुढील प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली.

No comments:
Post a Comment