चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
ऐन नगरपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत गोवा बनावटीच्या दारूसह १२ लाख १८ हजारांचा मुद्देमाल चंदगड पोलिसांनी पाठलाग करून जप्त केला. हि घटना तिलारी नगर चंदगड मार्गावर हेरे ते ताम्रपर्णी नदी पुल दरम्यान घडली. या घटनेत मुरकुटेवाडी येथील तिघांवर गुन्हा नोंदविण्यात आला होता.
चंदगड पोलीस ठाणे कडील दाखल दि.२९/११/२०२५ या गुन्ह्यातील संशयित जोतीबा वैजु चव्हाण (वय - २९), संतोष मारुती चव्हाण (वय - २८) व महांतेश मल्लाप्पा देसाई (वय - २६, सर्व रा. मुरकुटेवाडी, ता. चंदगड जि. कोल्हापुर) यांचे ताब्यातुन जप्त केलेले वाहन महिद्रा कंपनीची सिल्वहर रंगाची कारच्या पाठीमागील डीक्कीमधुन वन्यसदृश्य प्राणी कुजलेला वास येत असलेबाबत पोलीस ठाणे चंदगड यांच्याकडून वनविभाग चंदगड कार्यालयास कळवीले. त्यानुसार पोलीस निरिक्षक विश्वास पाटील (पोलीस निरीक्षक, चंदगड), वनविभागाचे तुषार गायकवाड (परिक्षेत्र वनअधिकारी, चंदगड) के. एस. डेळेकर (परिमंडळ वनअधिकारी, चंदगड), एस. जी. कोळी (वनरक्षक चंदगड), एम. आय. सनदी (वनरक्षक जांबरे) व अजय वाडेकर (पो.हे.कॉ.) आदी कर्मचारी यांनी पोलीस ठाणे चंदगड येथे जावुन कारची तपासणी केली असता वाहनाचे मागील बाजुचे डीक्कीचे खालील बाजुस आलेल्या स्टेपनी टायर वर लपवून ठेवलेले मृत साळीदर / सायाळ वन्यप्राणी मिळुन आला.
हा वन्यप्राणी सुमारे २ ते ३ दिवसापुर्वी मृत झालेला असुन त्याची दुर्गधी येत होती. तसेच सदर वाहनाचे पाठीमागील दोन्ही चाकाचे मधोमध जमीनीवर व स्टेपनी टायर वर रक्त साचलेले दिसुन आले. मृत वन्यप्राणी साळीदंर / सायाळ हा वरील आरोपी क्र.१ ते ३ यांचे ताब्यातील पोलीस विभागाने जप्त केलेल्या वाहनामधुन जप्त करुन ताब्यात घेतला. संशयित आरोपी क्र.१ ते ३ यांनी साळीदर / सायाळ या वन्यप्राण्याची शिकार करुन त्याचे कारमध्ये लपवुन ठेवुन त्याची अवैध वाहतुक केलेचे दिसुन आले. या प्रकरणी के. एस. डेळेकर (परिमंडळ वनअधिकारी, चंदगड) यांनी आपले कडील वन अपराध क्र.प्र.गु.रि.नं.डब्लु एल-०१/२०२५ दि.०२/१२/२०२५ चा वन गुन्हा नोंद केला आहे.
दि.०२/१२/२०२५ रोजी पशुधन विकास अधिकारी, चंदगड यांचे कडुन सदर मृत वन्यप्राणी साळीदंर /सायाळ-१ (नाशवंत/कुजण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झालेले) चे शवविच्छेदन करुन घेतले. दि.०३/१२/२०२५ रोजी न्यायालयाचे परवानगीने सदरचे मृत वन्यप्राणी साळीदंर सायाळ-१ यांचे विल्हेवाट अधिकाऱ्यांच्या समक्ष लावण्यात आली. या प्रकरणी संशयित आरोपी क्र. ०१ ते ०३ यांना दि.०५/१२/२०२५ रोजी रितसर अटक करुन त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग-१ चंदगड यांचे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ०८/१२/२०२५ पर्यंत वनकोठडी सुनावली आहे.
या गुन्हयाचा तपास धैर्यशिल पाटील (उप वनसंरक्षक (प्रा.), कोल्हापुर), विलास काळे (सहाय्यक वनसंरक्षक कोल्हापुर) यांचे मार्गदशनाखाली टी. आर. गायकवाड (परिक्षेत्र वनअधिकारी चंदगड), कृष्णा डेळेकर (परिमंडळ वनअधिकारी, चंदगड), वनरक्षक सागर कोळी, वनरक्षक मौलामुबारक सनदी, श्रीमती सादीया तांबोळी, कृष्णा शेरे, राहुल जऱ्हाड, राजु धनवई तसेच वनपरिक्षेत्र चंदगडकडील सर्व कर्मचारी व वन्यजीव बचाव पथक, चंदगड यांनी कारवाई केली.
वन व वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन व जैवविविधतेचे जतन करणे आवश्यक असुन वन्यप्राण्यांचे अवैद्य शिकार, वृक्षतोड व अतिक्रमण होत असेल तर तात्काळ परिक्षेत्र वनअधिकारी यांचे कार्यालय चंदगड अथवा वनविभाग कोल्हापुर कडे माहिती देणेत यावी असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment