मस्कत- ओमान मध्ये राहून जपली भारतीय संस्कृती, हुंबरवाडी येथील पट्टेकर कुटुंबीयांचा आदर्श - चंदगड लाईव्ह न्युज

29 April 2026

मस्कत- ओमान मध्ये राहून जपली भारतीय संस्कृती, हुंबरवाडी येथील पट्टेकर कुटुंबीयांचा आदर्श

 

मस्कत ओमान येथे राहत असलेले पट्टेकर कुटुंबीय

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

    आपल्या चंदगड तालुक्यातील हजारो बांधव जगाच्या कानाकोपऱ्यातील विविध देशात नोकरी उद्योग व्यवसायानिमित्त राहत आहेत. त्या त्या देशातील लोकांचे राहणीमान लोकजीवन संस्कृती पाहत असताना तिथे गेलेल्या 'आपल्या' लोकांनी तिथे आपल्या कामाचा ठसा उटवण्याबरोबरच आपली भारतीय व महाराष्ट्रीयन संस्कृती टिकवून ठेवली आहे. आपले सण उत्सव, महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील किंबहुना चंदगड सारख्या महाराष्ट्रातील शेवटच्या तालुक्यातील संस्कृतीची झलक तिथल्या लोकांसमोर मांडण्यात आपले लोक नेहमी अग्रेसर राहिले आहेत. याची अनेक उदाहरणे आपण नेहमी पाहतो व ऐकतो. 

    असाच एक आदर्श उपक्रम मस्कत ओमानमध्ये राहत असलेल्या (मुळगाव हुंबरवाडी, ता. चंदगड)  पट्टेकर कुटुंबीयांनी राबवला आहे. तुकाराम मारुती पटेकर हे सध्या नोकरी व्यवसायानिमित्त ओमान देशात राहतात.  त्यांची कन्या कुमारी गिरीजा हिच्या सातव्या वाढदिवसानिमित्त पश्चिमात्य संस्कृतीचा आपल्यावरील पगडा झुगारून देत हा वाढदिवस साधेपणाने तसेच अध्यात्मिक व संस्कारक्षम वातावरणात साजरा केला. वाढदिवस प्रसंगी तेथील बालगोपाळांसह सर्वांनी उपस्थित राहून हनुमान चालीसाचे सामूहिक पठण केले.  मस्कत मधील वाढदिवसानिमित्त उपस्थित सर्वांना महाराष्ट्रीयन संस्कृतीचे पुरणपोळीचे जेवण दिले. या आगळ्यावेगळ्या वाढदिवस कार्यक्रमाचे व विविधतेने नटलेल्या भारतीय संस्कृती परंपरांचे मस्कत मधील मित्रानी कौतुक केले.

No comments:

Post a Comment