चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
तांबुळवाडी (ता. चंदगड) येथील अनिता बाबुराव पाटील (वय ६६) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी दि. २९ निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, तीन मुली, सून, जावई असा परिवार आहे. दौलत सहकारी साखर कारखान्याचे निवृत्त अकाउंटंट बी. एस. पाटील यांच्या त्या पत्नी व दौलत - अथर्व साखर कारखान्याचे इंजिनीयर विनायक पाटील यांच्या त्या मातोश्री होत. तर केडीसीसी बँक चंदगड शाखेचे कॅशियर अजित पाटील यांच्या त्या सासू होत. रक्षाविसर्जन शुक्रवारी सकाळी होणार आहे.

No comments:
Post a Comment