चंदगडच्या विद्यार्थ्यांची दमदार झेप; टीसीएसमध्ये प्रतिष्ठेची नोकरी! - चंदगड लाईव्ह न्युज

28 April 2026

चंदगडच्या विद्यार्थ्यांची दमदार झेप; टीसीएसमध्ये प्रतिष्ठेची नोकरी!



चंदगड / प्रतिनिधी

चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या संख्याशास्त्र विभागासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. विभागातील माजी विद्यार्थी नरेंद्र कडूकर (कोनेवाडी), ऋतुजा फाटक (हिंडगाव) आणि ओमकार आवटे (हेरे) यांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर टीसीएस (Tata Consultancy Services) या नामांकित कंपनीत असिस्टंट सिस्टीम इंजिनिअर पदावर यशस्वी निवड मिळवली आहे. त्यांना वार्षिक तब्बल ५.४ लाख रुपयांचे आकर्षक पॅकेज मिळाले आहे.

या यशामागे विद्यार्थ्यांची जिद्द, परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यास याबरोबरच महाविद्यालयातील प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संख्याशास्त्र विभागातील प्रा. लालासाहेब गायकवाड, प्रा. मनाली हांडे आणि प्रा. प्रियंका निट्टुरकर   यांनी विद्यार्थ्यांना योग्य दिशा देत त्यांच्या करिअरला भक्कम पाया घालण्याचे काम केले.

या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली असून, इतर विद्यार्थ्यांसाठीही हे प्रेरणादायी ठरत आहे. चंदगडसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील नामांकित कंपनीत स्थान मिळवणे ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाविद्यालय परिसरात तसेच पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.  तसेच, या यशाबद्दल महाविद्यालय व खेडूत शिक्षण संस्थेच्या वतीने संबंधित विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले,

No comments:

Post a Comment