चंदगड : सी एल वृत्तसेवा
गणुचीवाडी (ता. चंदगड) येथील महालक्ष्मी देवी यात्रेनिमित्त गणुचीवाडी प्रीमियर लीग (जीपीएल) २०२६ या गावमर्यादित क्रिकेट स्पर्धा होणार आहे. आहे. ही स्पर्धा शुक्रवारी दि. १ मे ते रविवारी दि. ३ मे या कालावधीत मराठी शाळा मैदानावर होणार आहेत.
स्पर्धेसाठी २१ हजार, १५ हजार, १० हजार, ५ हजार अशी अनुक्रमे बक्षिसे आहेत. याशिवाय मालिकावीर, ऑरेंज कॅप, पर्पल कॅप, इमर्जिंग प्लेअर आणि सुपर सिक्स सारखी अनेक वैयक्तिक बक्षिसेही खेळाडूंना दिली जाणार आहेत. १० संघांचा सहभागआहे. गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी या संघांची जबाबदारी स्वीकारली आहे.
यामध्ये प्रामुख्याने सुनील अर्दाळकर, दिनकर भादवणकर, प्रवीण भादवणकर, इंजिनीयर मयूर अर्दाळकर, अंकुश हुसेनकर, मोहन वाइंगडे, सचिन भादवणकर, वैभव भादवणकर, दिपक भादवणकर, सुधीर भादवणकर, विशाल भादवणकर, श्रीधर अर्दाळकर आणि धनाजी वाईंगडे हे संघ मालक म्हणून या स्पर्धेमध्ये खेळाडूंना प्रोत्साहन देणार आहेत. साखळी पद्धतीने होणाऱ्या या सामन्यांमुळे तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, क्रिकेट प्रेमींनी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment