आमदार शिवाजीराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाले २० लाख प्रलंबित पीक विमा अनुदान - चंदगड लाईव्ह न्युज

27 April 2026

आमदार शिवाजीराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाले २० लाख प्रलंबित पीक विमा अनुदान

चंदगड / प्रतिनिधी

    महाराष्ट्र राज्यात पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना (RWBCIS) राबविली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश हवामानातील प्रतिकूल बदलांमुळे (उदा. अवेळी पाऊस, कमी-जास्त तापमान, वेगाचा वारा) फळबागांचे होणारे नुकसान भरून काढणे हा आहे.चंदगड तालुक्यात एकूण सहा महसूल मंडळे आहेत.चंदगड, हेरे, नागणवाडी, माणगाव, तुर्केवाडी या पाच महसूल मंडळामधून काजू व आंबा फळ पीक विमा एकूण १०२ शेतकऱ्यांनी ११६.०२ हे क्षेत्रावर विमा संरक्षित केला होता. हवामान आधारित नुकसानीची आकडेवारी शासनास प्राप्त झाली होती सन २०२४ मधील पाच महसूल मंडळातील चार महसूल मंडळाचे ३५ लाख ६२००० हजार अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात ऑक्टोबर २०२५ अखेर जमा करण्यात आले.प्रलंबित चंदगड महसूल मंडळाचे अनुदान जमा झाले नव्हते.चंदगड महसूल मंडळाचे हवामान केंद्र नगर पंचायत च्या हद्दीत होते ते इमारतीचे काम सुरू असताना बंद केले होते. त्यामुळे चंदगड महसूल मंडळातील हवामान नुकसानीचे आकडे प्राप्त नसल्यामुळे प्रलंबित पीक विमा अनुदान शेतकर्यांना मिळणे बाबत अडचणी येत होत्या.याबाबत चंदगड तालुक्याचे  आ.श्री शिवाजीराव पाटील साहेब यांनी विधान सभेत विषय मांडून त्या महसूल मंडळाचे अनुदान जमा होण्यासाठी सतत पाठपुरावा केला.त्यांच्या प्रयत्नामुळे  चंदगड महसूल मंडळातील प्रलंबित अनुदान २० लाख ४४८ रु अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले.चंदगड महसूल मंडळातील हवामान केंद्राची माहिती लगतच्या असलेल्या नागनवाडी महसूल मंडळातून घेण्यात आली. यासाठी तालुका कृषी अधिकारी श्री. विवेकानंद तानाजी चव्हाण व भारतीय विमा कंपनीचे समन्वयक सागर पुंडलिक सुतार यांचेही सहकार्य मिळाले.चंदगड तालुक्यात २०२४ मधील  एकूण ५५ लाख ६३००० हजार ३४६ रु आज अखेर शेतकर्याच्या खात्यात जमा करण्यात आले.

No comments:

Post a Comment