भगतसिंग ॲकॅडमीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, माजी आमदार, पंचायत समिती सभापती, उपसभापती यांची उपस्थिती - चंदगड लाईव्ह न्युज

21 June 2026

भगतसिंग ॲकॅडमीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, माजी आमदार, पंचायत समिती सभापती, उपसभापती यांची उपस्थिती

 


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

    धुमडेवाडी (ता. चंदगड) येथील भगतसिंग ॲकॅडमीत पारगड मॅरेथॉन मध्ये विजेत्या स्पर्धकांचा व विविध भरती प्रक्रियेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पारगड हेरिटेज रन मॅरेथॉन स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व मेडल देऊन गौरवण्यात आले.

    5 कि.मी. धावणे - विद्या बिर्जे व सानिका पावशे -  द्वितीय क्रमांक, करिना नाईक - तृतिय क्रमांक, तसेच मुंबई पोलीस भरतीत निवड झालेली वैशाली पाटील, व अग्नीवीर एअर फोर्स इंटेक भरती झालेली तालुक्यातील पहिली मुलगी किरण गुरव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच स्विमिंग मध्ये अगदी लहान वयात 150 हून अधिक पदकांना गवसणी घालणाऱ्या भगतसिंग गावडे याचाही सत्कार करण्यात आला. 

  प्रास्ताविक करताना ॲकॅडमीचे अध्यक्ष भारत गावडे यांनी यश मिळवण्यासाठी चिकाटी, सातत्य आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं.स चंदगडच्या  उपसभापती संज्योती मळवीकर होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशामागील अनुभव व कठोर परिश्रमाची यशोगाथा मांडली.

    कार्यक्रमास  माजी आमदार राजेश पाटील, पं.स चंदगड सभापती विलास नाईक, माजी सभापती भरमाणा गावडे, प्रा. एच. के. गावडे, प्रा आर. बी. गावडे, प्राचार्य आर डी. पाटील, अनंत धोत्रे, पुंडलिक पाटील, माधूरी पाटील (पोलीस पाटील बोंजूर्डी) यांच्यासह ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी व भगतसिंग ॲकॅडमीचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. अजय पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment