चंदगड : सी एल वृत्तसेवा
निट्टूर (ता. चंदगड) येथील रहिवाशी शंकर रेमजी कांबळे (वय ७३) यांचे रविवार दिनांक १४ जून २०२६ रोजी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे. शंकर कांबळे हे निट्टूर येथे विविध समाजकार्यात अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते. गेली १४ वर्षे ते गावातील श्री गणेश प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार बनवण्याचे काम करत. त्यामुळे ते शैक्षणिक क्षेत्रातही परिचित होते. निट्टूर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगळवार दिनांक १६ रोजी रक्षा विसर्जन होणार आहे.

No comments:
Post a Comment