कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कागणी (ता. चंदगड) येथील श्री. व्ही. के. चव्हाण-पाटील विद्यालयाचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी भिमगोंड सिद्राम पाटील (कुदनूर, ता. चंदगड) हे दिनांक ३१ मे २०२६ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. प्रामाणिक व निष्ठावान कर्मचारी म्हणून ते पंचक्रोशीत परिचित होते.
संस्था व विद्यालयाच्या वतीने आयोजित त्यांचा सेवानिवृत्ती समारंभ वेगळ्या अर्थाने संस्मरणीय ठरला. याच दिवशी त्यांचा सुपुत्र निखिल नवीमुंबई पोलीस दलात भरती झाला. वडिलांच्या सेवानिवृत्तीचा आनंद आणि मुलाच्या यशस्वी कारकिर्दीची सुरुवात हा खरोखरच दुग्धशर्करा योग ठरला. यावेळी बाप आणि मुलगा या दोघांचाही एकत्रित सत्कार करून विद्यालयाने त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला.
या भावनिक कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे सचिव राजू हगिदळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमगोंडा बिरादार, माजी मुख्याध्यापक ए. जे. देसाई, निवृत्त अध्यापक एस. आर. गुंडकल, जी. आर. कांबळे, डी. एम. जाधव यांच्यासह विद्यमान शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment