चंदगड / प्रतिनिधी :
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ईनाम सावर्डे (ता. चंदगड) येथे बुधवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. "रक्तदान हेच श्रेष्ठ दान" हा संदेश देत अधिकाधिक नागरिकांनी रक्तदान करून समाजसेवेच्या या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हे रक्तदान शिबिर सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.०० या वेळेत ईनाम सावर्डे येथे होणार असून, रक्तदानामुळे गरजू रुग्णांना नवजीवन मिळण्यास मदत होते. त्यामुळे वाढदिवस साजरा करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे रक्तदान, असा संदेश या उपक्रमातून देण्यात येत आहे.
या उपक्रमाला चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांचे मार्गदर्शन लाभले असून, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आयोजकांनी सर्व इच्छुक रक्तदात्यांनी वेळेत उपस्थित राहून समाजहिताच्या या उपक्रमाला यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.

No comments:
Post a Comment