![]() |
| कु. सारंग राजेंद्र हदगल |
चंदगड / प्रतिनिधी :
चंदगड तालुक्यातील कुदनूर (नागरदळे) येथील कु. सारंग राजेंद्र हदगल याने वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या री-नीट (Re-NEET) परीक्षेत ५८९ गुण मिळवत ऑल इंडिया रँक (AIR) १४ हजार प्राप्त केली आहे. या यशामुळे त्याचा सरकारी कोट्यातून एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असून, त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थी असलेल्या सारंगने जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण परिश्रमाच्या बळावर हे यश संपादन केले. नीट परीक्षेतील वाढती स्पर्धा आणि आव्हानात्मक परिस्थितीवर मात करत त्याने री-नीट परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवले. त्याच्या या यशामुळे परिसरातील विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.
सारंग हा बेळगाव येथील जोती कॉलेजचे प्राध्यापक आर. डी. हदगल यांचा सुपुत्र असून, चंदगड येथील न. भु. पाटील ज्युनिअर कॉलेजचे क्रीडा शिक्षक प्रा. एन. डी. हदगल यांचा पुतण्या आहे. शिक्षणाची परंपरा लाभलेल्या कुटुंबातील सारंगने आपल्या गुणवत्तेची राष्ट्रीय स्तरावर छाप पाडली आहे.
सारंगच्या या यशामुळे कुदनूर, नागरदळे परिसरासह संपूर्ण चंदगड तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्याचे अभिनंदन करत पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. भविष्यात सक्षम डॉक्टर म्हणून रुग्णसेवा व समाजसेवा करण्याची अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

No comments:
Post a Comment