चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तहसील कार्यालयाचे अप्पर तहसील कार्यालय मजरे कारवे येथे स्थापन करण्याच्या शासनाच्या प्रस्तावाला चंदगड शहरातील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, महसूल मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे सविस्तर हरकतीचे निवेदन सादर करण्यात आले आहे.
हरकतीत मांडण्यात आलेले प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत -
चंदगड तहसील कार्यालय महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून चंदगड येथे कार्यरत असून त्याच्या कामकाजाबाबत कोणतीही गंभीर तक्रार नाही.
तालुक्यातील न्यायालय, भूमी अभिलेख, पंचायत समिती, दुय्यम निबंधक, कृषी, आरोग्य, पोलीस, बँका आदी सर्व प्रमुख शासकीय कार्यालये चंदगड येथेच कार्यरत आहेत.
चंदगड हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असून सर्व गावांमधून एसटी व अन्य वाहतुकीची चांगली सुविधा उपलब्ध आहे.
चंदगड ते मजरे कारवे हे केवळ १६ ते १७ किलोमीटर अंतर असल्याने स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालयाची आवश्यकता नाही.
ई-महासेवा केंद्रे, महाऑनलाईन, आपले सरकार पोर्टल आणि डिजिटल सेवांमुळे बहुतांश महसुली सेवा नागरिकांना गावपातळीवर व ऑनलाइन उपलब्ध आहेत.
तलाठी व मंडळ अधिकारी संगणकीकृत प्रणालीद्वारे गावोगावीच महसुली कामकाज करत असल्याने तहसील कार्यालयावरील अतिरिक्त भार राहिलेला नाही.
नव्याने अप्पर कार्यालय उभारणे म्हणजे शासनाच्या निधीचा अनावश्यक खर्च असून चंदगड येथील नव्याने उभारलेल्या प्रशासकीय इमारतीचा उपयोग कमी होईल.
अप्पर तहसील कार्यालयामुळे नागरिकांची पूर्णपणे गैरसोय दूर होणार नाही, कारण इतर अनेक शासकीय कामांसाठी नागरिकांना चंदगडलाच यावे लागणार आहे.
शासनाने नवीन कार्यालय उभारण्याऐवजी विद्यमान तहसील कार्यालयातील कर्मचारी संख्या, संगणक सुविधा, इंटरनेट, सौरऊर्जा व्यवस्था आणि ई-महासेवा केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
काही राजकीय स्वार्थातून हा प्रस्ताव पुढे आणल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. नागरिकांनी शासनाने मजरे कारवे येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देताना चंदगड अर्बनचे चेअरमन दयानंद काणेकर, शिवानंद हुंबरवाडी, अली मुल्ला, नावीद अत्तार, प्रवीण वाटंगी, सुरेश सातवणेकर, नगराध्यक्ष सुनिल काणेकर, माजी जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, नगरसेवक अमय सबनीस, अजिंक्य पिळणकर, गायत्री बल्लाळ, एकता दड्डीकर, सचिन सातवणेकर, अबुजर मदार, सिकंदर नाईक, अशोक दाणी, शितल कट्टी, जयश्री वणकुद्रे, आयेशा नाईकवाडी, सुचिता कुंभार, माधवी शेलार, सुभाष गावडे, संतोष वणकुंद्रे, यशवंत डेळेकर, प्रमोद कांबळे, बाबुराव हळदणकर, मधुकर देसाई, अरुण गवळी यांच्यासह शहरातील प्रमुख मंडळी उपस्थित होती.

1 comment:
चंदगड कोल्हापूर प्रशासनात भ्रष्टाचाराचा उच्चांक! असहाय्य गरीब दिनदुबळ्या अन्नदात्या रयतेची लुट! भाजपा सरकारचा भ्रष्टाचाराला संपूर्ण पाठिंबा!!
आज कुणबी समाज, भ्रष्ट प्रशासकीय अधिकारी खोटे दस्त बनवून कुणबी समाजाच्या शेतजमिनी लुबाडत असल्याने हवालदिल झाला आहे.
छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या रयतेच्या राज्यात रयतेची लूटमारी, भ्रष्ट्राचारी अधिकाऱ्यांना महाराष्ट्र भाजपा सरकारचे संरक्षण!
"सतत तीन वर्षे केंद्रातर्फे पुरस्कारीत, भ्रष्टाचारात अव्वल क्रमांक पटकावणारे भारतातील एकमेव राज्य - महाराष्ट्र!"
महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन!
हेच ते छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे रयतेचे राज्य! लोकमान्य टिळक, डॉ आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे राज्य! आज तेच राज्य शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे राज्य ठरले आहे. शेतकऱ्याला कुणीही वाली उरला नाही.
"आमच्या अधिकाऱ्यांनी फक्त दिड लाख शेतकरी कुंटुंबांच्या जमिनी हडपल्या आहेत!" असे महसुलमंत्री मान्य करतात. पण एवढ्या क्षुल्लक गोष्टीसाठी एवढी मोठी बोंब का?
खोटे दस्त बनवून भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडण्याचे प्रकार होत असल्याने शेतकरी हैरान आणि हताश झाले आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारने भ्रष्ट्राचार करणे न्यू नॉर्मल ठरवले आहे कि काय असे वाटू लागले आहे. दिड - दोन वर्षांपासून आम्ही चंदगड, गडहिंग्लज या कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्यातील खोटे दस्त बनवून गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडण्याचे स्कॅम रॅकेट मुख्यमंत्री ते महाराष्ट्रातील सर्व वरिष्ठ अधिकारी यांना अवगत करून देत आहोत. पण परिणाम शून्य!! अशी दुर्दशा झाली आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज्यांच्या रयतेच्या राज्याची!!! मुळात मुख्यमंत्री भ्रष्ट्राचार हा गुन्हाच समजत नाहीत! पाहाः See the proofs of corruption in Chandgad, Gadhinglaj, Kolhapur:
https://sites.google.com/view/maha-farmers-agnst-corruption/forged-docs
Post a Comment