मलतवाडी येथील पिराजी कृष्णा पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

25 August 2026

मलतवाडी येथील पिराजी कृष्णा पाटील यांचे निधन

 

पिराजी कृष्णा पाटील

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

मूळचे मलतवाडी (ता. चंदगड) व सध्या योगेश्वरी कॉलनी, कोल्हापूर येथील पिराजी कृष्णा पाटील (वय ७८) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी (दि. 24) दुपारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, जावई, नातवंडे, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. ते कोल्हापूर येथील गव्हर्मेंट आयटीआय कॉलेजचे निवृत्त गट निर्देशक होते. रक्षाविसर्जन गुरुवारी सकाळी आठ वाजता होणार आहे. कोल्हापूर येथील जिल्हा परिषद पे युनिट मधील क्लर्क अमोल पाटील व व्यवसायिक अनिल पाटील यांचे ते वडील होत. कोवाड येथील कला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. आर. टी. पाटील यांचे ते सासरे तर मलतवाडीतील विकास सेवा संस्थेचे माजी चेअरमन प्रभाकर पाटील यांचे ते बंधू होत.

No comments:

Post a Comment