चंदगड / प्रतिनिधी :
सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि दरड कोसळल्याच्या घटनांमुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग तसेच जुना मुंबई–पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक गंभीरपणे विस्कळीत झाली आहे. यामुळे दोन्ही दिशेची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आल्याची माहिती चंदगड आगार प्रमुख सतीश पाटील यांनी दिली.
यामुळे पुणे–मुंबई तसेच मुंबई–पुणे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी अत्यावश्यक नसल्यास प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अत्यावश्यक प्रवास करावाच लागल्यास प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या वाहतूकविषयक सूचना आणि अद्ययावत माहितीनुसारच प्रवास करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन आगार प्रमुख सतीश पाटील यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment