
कुदनूर येथे एक दिवस बळीराजासाठी उपक्रमांतर्गत चिखलात अनुभवी शेतकऱ्याप्रमाणे भात रोप लावणीत मग्न झालेले विद्यार्थी, सोबत शिक्षक.
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
"गुडघा गुडघा चिखलात, गुडघा गुडघा चिखलात, रोप लाविले हो रोप लाविले, एक एक भाताचे रोप लाविले हो रोप लाविले....!" म्हणत कुदनुर तालुका चंदगड शाळेतील मुला-मुलींनी अक्षरशः गुडघ्यावर चिखलात भाताची रोपे लावण्याचा आनंद घेतला.
शासनाच्या एक दिवस बळीराजासाठी उपक्रमांतर्गत कोथरूड येथील केंद्र शाळा कुमार केंद्र शाळा व कन्या शाळा या दोन शहरातील विद्यार्थी व शिक्षका शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी गावातील प्रगतशील शेतकरी व सेवा संस्थेचे माजी चेअरमन ओमाना लक्ष्मण भंबर्गेकर तसेच विष्णू नकुडकर यांच्या शेतात भात रोप लावण्याचा आनंद घेतला. गावातील तज्ञ शेतकऱ्यांच्या मदतीने शेतात चतुसूत्री पद्धतीने भात रोपांची लावणी करण्यात आली. आपले आई-वडील शेतात ऊन वारा पाऊस चिखल यांची तमा न बाळगता कष्ट मेहनत घेतात याची जाणीव विद्यार्थ्यांना यानिमित्ताने झाल्याशिवाय राहणार नाही.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्र शाळा कुमार कुदनूर चे मुख्याध्यापक यादव मोदकेकर कन्या शाळेचे मुख्याध्यापक राजू तोडकरी अध्यापक देवानंद पाटील प्रमिला कुंभार अविनाश कांबळे सुखदेव भातखंडे यांनी परिश्रम घेतले. चिखलात वावरताना चिमुकल्या मुला मुलींचा उत्साह अक्षरशः ओसंडून वाहत होता.
No comments:
Post a Comment