चंदगड / प्रतिनिधी :
राज्य शासनाच्या 'एक दिवस माझा बळीराजासाठी' या उपक्रमांतर्गत चंदगड तालुक्यातील कानूर खुर्द येथे शेतकऱ्यांसाठी विविध कृषी विषयांवरील मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी सुधारित भात लागवड तंत्रज्ञान, वृक्ष लागवड, नाचणी बियाणे वाटप तसेच शासनाच्या विविध कृषी योजनांची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करून उत्पादनवाढ साधण्याचे आवाहन उपस्थित अधिकाऱ्यांनी केले.
कार्यक्रमास समन्वय अधिकारी अश्विनकुमार कचरे, पंचायत समिती सदस्य मनस्विनी कांबळे, सहायक कृषी अधिकारी नामदेव पालव, ग्राम विकास अधिकारी अश्विनी धुमाळे, ग्राम विकास अधिकारी अंकुश पाटील, कानूर खुर्दचे सरपंच गुंडू कबाडी, उपसरपंच अंबादास पाटील तसेच परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती जाणून घेत लाभ घेण्याबाबत उत्सुकता दर्शविली. कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना सुधारित शेती तंत्रज्ञान आणि उपलब्ध योजनांची उपयुक्त माहिती मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.

No comments:
Post a Comment