निट्टूर येथील आधार बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन; बेरोजगार युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी - चंदगड लाईव्ह न्युज

01 July 2026

निट्टूर येथील आधार बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन; बेरोजगार युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    आधार बहुउद्देशीय सेवा संस्था, निद्रू (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) यांच्या वतीने चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील बेरोजगार युवक-युवतींसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा रोजगार मेळावा शनिवार, दि. ४ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता श्री गणेश प्राथमिक विद्यामंदिर, निद्रू, ता. चंदगड, जि. कोल्हापूर येथे होणार आहे.

    या रोजगार मेळाव्यात कोल्हापूर, पुणे, गोवा, बेंगळुरू तसेच इतर शहरांतील विविध नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. बारावी, आयटीआय, बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बी.फार्म, डी.फार्म, डिप्लोमा, इंजिनिअरिंग तसेच इतर पदवीधर उमेदवार या मेळाव्यात सहभागी होऊ शकतात.

    संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. डॉ. बी. एल. पाटील यांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा लाभ सर्व बेरोजगार युवक-युवतींनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक राज्यांमधील विविध नामांकित कंपन्यांसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे तरी इच्छुक उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यावा.

    या मेळाव्यामध्ये  टेव्हा लिमिटेड (Teva Ltd), व्हर्गो लिमिटेड (Vergo Ltd), इंडोको रेमेडीज लिमिटेड (Indoco Remedies Ltd), मोलबायो डायग्नॉस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड (Molbio Diagnostics Pvt. Ltd.), विम्टा लॅब (Vimta Lab), पी अँड जी लिमिटेड (P&G Ltd), एनक्यूब लिमिटेड (Enqube Ltd), मायक्रो लॅब लिमिटेड (Micro Lab Ltd), मार्कसन्स फार्मा लिमिटेड (Marksans Pharma Ltd), सिप्ला लिमिटेड (Cipla Ltd), युनिकेम लिमिटेड (Unichem Ltd), ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड (Glenmark Pharmaceuticals Ltd), झायडस कॅडिला लिमिटेड (Zydus Cadila Ltd), फायझर लिमिटेड (Pfizer Ltd), ल्युपिन लिमिटेड (Lupin Ltd), सॅनोफी लिमिटेड (Sanofi Ltd), ट्युलिप्स लिमिटेड (Tulips Ltd), टेनस्टा फार्मा (Tensta Pharma), एफडीसी लिमिटेड (FDC Ltd), सिग्मा लिमिटेड (Sigma Ltd), गीनो लिमिटेड (Geeno Ltd) व सेंटॉर लिमिटेड (Centaur Ltd) या कंपन्या सहभागी आहेत. 

    या रोजगार मेळाव्याच्या अधिक माहितीसाठी संपर्क : प्रा. डॉ. राजाराम सावळे – ९४२११०३७६६, जी. आर. पाटील (अध्यक्ष) – ९४२२४३४९०७,  वाय. डी. कांबळे (उपाध्यक्ष) – ७३८५४४६८६४, के. एन. पाटील (सचिव) – ९७६६२४६६५७ यांच्याशी संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment