सध्या हवामान बदलत आहे, त्यामुळे सापापासून सावध राहा......! सर्पमित्र प्रा. सदाशिव पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

01 July 2026

सध्या हवामान बदलत आहे, त्यामुळे सापापासून सावध राहा......! सर्पमित्र प्रा. सदाशिव पाटील

  

चंदगड : श्रीकांत पाटील - सी एल वृत्तसेवा 

   उन्हाळा संपून सध्या पावसाळा सुरू झाला आहे. परिणामी हवामानात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे याचा परिणाम चराचरसृष्टीवर नेहमीच होत असतो. तसाच तो पर्यावरणातील साखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या सापांवर सुद्धा होत असतो. परिणामी या काळात आपण पासून सावधगिरी बाळगावी अशी आवाहन ढोलगरवाडी सर्प शाळेचे सर्पमित्र प्राध्यापक सदाशिव पाटील आपल्या पन्नास वर्षाच्या अनुभवातून नागरिकांना आवाहन केले आहे...!

  सर्पमित्र प्रा.सदाशिव पाटील सर या आठवड्यातच मनुष्यवस्तीत शिरलेले सुमारे दहा-पंधरा साप पकडले. 

कार्वे येथे धामण,

तुर्केवाडी येथे नाग व घोणस,

हलकर्णी फाटा येथे नाग, 

शिवनगे येथे नाग, 

माणगाव येथे नाग,

यशवंतनगर धामण,

कार्वे येथे प्रा. तावदारे यांच्या घरी नाग,

बागिलगे येथे प्राथमिक शिक्षक सदानंद पाटील यांच्या घरी तस्कर,

माणगाव येथे एम. एम. शिवनगेकर सर यांच्या घरी नाग,

हलकर्णी फाटा संतोष सुतार यांच्या घरी धामण,

विशेष म्हणजे हे बरेचसे साप या आठवड्यातच मिळाले. प्रा. पाटील यांनी ते रेस्क्यू करून जंगलात सोडले...

    यामध्ये महत्त्वाची बाब सर्पमित्र सदाशिव पाटील यांनी सांगितली ती अशी, काल एकाच दिवशी अति विषारी मन्यार जातीचे साप सापडले. तेही भर दुपारी, सुंडी- ढोलगरवाडी रस्त्यावरील घराच्या मागे पाणलोट मध्ये एक मन्यार सापडला. गौळवाडी येथे पाणी सोडण्याच्या चेंबरमध्ये दुपारी मण्यार सापडला. येथे जवळच शाळेतील मुले खेळत होती. त्यांचा चेंडू त्या चेंबरमध्ये गेला. मुलं हात घालणार तेवढ्यात त्यांना तो साप दिसला आणि अनर्थ टळला. सर्व मुलांनी घाबरून शाळेतील शिक्षक व ग्रामस्थांना सांगितले. सर्पमित्र पाटील यांनी येथे येऊन याचे विषारी जहाल विषारी सापाला पकडले.

 आपण मन्यार हा साप निशाचर म्हणजे रात्रीच्या वेळी फिरणारा असे शास्त्रीय दृष्ट्या म्हणतो. भक्षाच्या शोधासाठी फक्त रात्रीच्या वेळी फिरतो. मात्र हे साप दिवसा सापडले. सर्वच बाबतीत काही अपवाद असतात हेच खरे! याचे पर्यावरण प्रेमींना सुद्धा आश्चर्य वाटले? 

विशेषतः मन्यार रात्रीचाच मिळतो...! मात्र त्यालाही ही घटना अपवाद ठरली! ऋतुचक्र बदलते, हवामान बदलते. ऑक्टोबर हिट प्रमाणेच सध्या स्थिती आहे. पाऊस उशिरा सुरुवात होतोय. त्यामुळे साप उन्हाच्या वेळी बाहेर पडत आहेत. म्हणून शेतकऱ्यांनी,  शालेय  विद्यार्थ्यांनी व लहान मुले आणि इतर सर्वांनीच दक्षता घेणे गरजेचे आहे. याच काळात घोणस साप थेट पिलांना जन्म देतो एका घोणस ची मादी एकावेळी सुमारे ३० ते ५० पिलांना सुद्धा जन्म देते....!   उष्णतेमुळे सापही उन्हातून सैरभैर होत आहेत. त्यामुळे आपणच दक्षता घेणे गरजेचे आहे. 

    मळलेल्या वाटांवरुन  लक्षपूर्वक जाणे गरजेचे आहे. पावसाळ्यात अनेक वेळा विविध जातीचे साप (सन बाथ) उन्हे अंगावर झेलण्यासाठी बाहेर पडलेले असतात. अशाच आपण बसून आपण सावधगिरी बाळगावी. पावसाळ्यात साप राहत असलेल्या बिळांमधून पाणी भरल्यामुळे साप अडगळीच्या ठिकाणी, दगड, शेणी- लाकडांचे ढिगारे, कपड्यांची गाठोडी, लाकडे, कपड्यांची गाठोडी अशा ठिकाणी आश्रय घेत असतात. अशा ठिकाणी साहित्याची हलवा हलवा करताना पूर्ण दक्षता घेणे गरजेचे आहे.

     याशिवाय काजू फॅक्टरी मधील पोती, अथवा इतर साहित्य ठेवलेली जागा, जनावरांचे गोठे, जळण्यासाठी  उसाचे मोडे इ. सरपण, गवताचे ढीगारे, गवत गंजी इत्यादी ठिकाणी वावर करताना दक्षता घ्यावी. असे आवाहन सर्पमित्र सदाशिव पाटील यांनी केले आहे.

    गेली ५० वर्षे ढोलगरवाडी येथील मामासाहेब विद्यालयाचे संस्थापक व आद्य सर्पमित्र बाबुराव टक्के कर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी व नंतर प्राध्यापक म्हणून सदाशिव पाटील कार्यरत आहेत. इतक्या वर्षात सुमारे सहा ते सात हजार सापांना जीवदान देणारे सर्पमित्र पाटील यांनी कोणताही आर्थिक मोबदला न घेता एक सामाजिक कार्य व सापांविषयी जनजागृती चे व्रत अंगीकारले आहे.

      पर्यावरणातील अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक समजला जाणारा साप टिकला पाहिजे जगला पाहिजे त्याचे संरक्षण झाले पाहिजे या उदात्त हेतूने कार्य करणारे आद्य सर्पमित्र कै. बाबुराव टक्केकर यांचे कार्य खऱ्या अर्थाने प्रा. सदाशिव पाटील पुढे चालवताना दिसत आहेत. 

  शेकडो विषारी, जहाल विषारी, खतरनाक सापांच्या मध्ये वावरत स्वतःचा जीव धोक्यात घालून इतकी वर्षे सापांच्या माध्यमातून समाज व पर्यावरण सेवा करणाऱ्या अशा अवलिया सर्पमित्राचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.

No comments:

Post a Comment