कोवाडमध्ये भव्य आरोग्य शिबिर; 150 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी - चंदगड लाईव्ह न्युज

26 June 2026

कोवाडमध्ये भव्य आरोग्य शिबिर; 150 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

कोवाड /  सी एल वृत्तसेवा 

कोवाड (ता. चंदगड) : ओएफ आय,ओलंम साखर कारखाना राजगोळी खुर्द आणि भरारी सामाजिक संस्था ,नेसरी यांच्या संयुक्त विद्यमाने  स्वास्थ, सेवा अभियान अंतर्गत कोवाड येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात सुमारे 150 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

या शिबिरामध्ये नागरिकांची  तज्ञ डॉक्टर मार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने बी पी शुगर (डायबेटिज)तपासणी.,स्त्री रोग तज्ञ,बालरोग तज्ञ,हाडांचे स्पेशालिस्ट, शस्त्रचिकित्सा तज्ञ, पथोलोजिस्ट, ई सी जी तसेच मोफत नेत्र तपासणी इत्यादी तपासण्या ह्या विनामूल्य करण्यात आल्या.

शिबिराचे उद्घाटन माजी सैनिक संघटना, कोवाड तसेच गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

शिबिर यशस्वी करण्यासाठी भरारी सामाजिक संस्था, नेसरीचे श्री. दीपक नाईक यांचे विशेष सहकार्य लाभले. याशिवाय डॉ. सागर खांडेकर, बालरोगतज्ज्ञ श्री. गजेंद्र पाटील, डॉ. नम्रता बावली, डॉ. सानिया मुमिगट्टी, डॉ. ऐश्वर्या गिरमे आणि डॉ. साक्षी चिपकर यांनी नागरिकांची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन व औषधोपचार केले.

उपकेंद्र मलतवाडीचे आरोग्य सेवक श्री. अमित लोहार, आरोग्य सेविका  संजीवनी पाटील, वंदना वांद्रे,तसेच आशासेविका  सुनीता पाटील, शीतल जाधव आणि नंदिनी पाटील यांनी शिबिरामध्ये भाग घेतला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विनायक कोले यांचेही विशेष सहकार्य लाभले. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा घराजवळ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.

No comments:

Post a Comment