रामपूरचे प्रभाकर कांबळे " "कोल्हापूर रत्न " पुरस्काराने सन्मानित - चंदगड लाईव्ह न्युज

02 July 2026

रामपूरचे प्रभाकर कांबळे " "कोल्हापूर रत्न " पुरस्काराने सन्मानित

चंदगड  (प्रतिनिधी): 

    राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र व जागृत नागरिक सेवा संस्था, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. विविध सामाजिक, सहकार, कामगार व सार्वजनिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

             खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते रामपूरचे सुपुत्र प्रभाकर तुकाराम कांबळे यांना  " कोल्हापूर रत्न" पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार सतेज उर्फ बंटी पाटीलआणि राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यउपस्थित होते. यावेळी   बोधी सामाजिक मंडळ, सम्यक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र सहदेव जाधव यांना "राष्ट्रीय समाजरत्न"तर सहकार भूषण पुरस्काराने सीए किशोर बिंद, प्रशांतकुमार शेरवेगार, राजू सोनकांबळे, दिपक शिंगरे आणि बाळकृष्ण तावडे यांचा सन्मान करण्यात आला. कामगार भूषण पुरस्कार अष्टपैलू कलाकार व गुणवंत कामगार विद्याधर राणे यांना, केरबा डावरे यांना शाहू पुरस्कार व तुळशीदास सन्नकेना कोल्हापूर भूषण  पुरस्कार प्रदान करण्यात आला.

       कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते रंगराव सावंत, सखाराम जाधव, अनिल म्हमाने व ज्येष्ठ सहकार तज्ञ डॉ प्रभाकर कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

       खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी आपल्या मनोगतातून समाजहितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना अशा पुरस्कारांमुळे प्रेरणा मिळते, असे सांगून पुरस्कारार्थींचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन उत्कृष्टरीत्या पार पडले. शेवटी संस्थेच्या सचिव अनिता काळे यांनी उपस्थित मान्यवर, पुरस्कारार्थी व सर्व उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment